महापालिका

महापालिका

15569
कोल्हापूर : शहरातील साथरोगांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेतर्फे कार्यशाळा झाली.

नागरिकांच्या सहकार्यातूनच
साथरोगांवर मात शक्य
केशव जाधव; डेंगीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : आशा वकर्स या प्रत्यक्ष काम करणारा महापालिकेचा घटक आहे. मात्र, महापालिका प्रशासनासह नागरिकांनी एकत्रित उपाययोजना राबवल्यास साथरोगावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी व्यक्त केले.
साथरोगाच्या नियंत्रणासाठी महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने सुरू केलेल्या विविध योजनांचा भाग म्हणून आशा वकर्स यांची संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे विशेष कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. डेंगी, मलेरिया, टॉयफाईड सारखे साथजन्य रोग आणि त्यावरील उपचाराची माहिती कार्यशाळेत दिली.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (मलेरिया) डॉ. हर्षदा वेदक यांनीही मार्गदर्शन केले. डेंगी डासांची पैदास स्वच्छ पाण्यात कशा प्रकारे होते. हा डास सर्वसाधारणपणे तीन ते चार किलोमीटर कसा उडत जातो आणि तो सर्वसाधारणपणे दिवसा सूर्यप्रकाशात चावा घेत असतो याबाबतची माहिती डॉ. वेदक यांनी दिली. याशिवाय या डासांची निवारण करावयाचे असलेस गप्पी माशांचा प्रयोग करणे कसे हिताचे आहे याबाबतचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. डॉ. मोरे यांनी डेंगीची अळी कशी ओळखावी, सर्व्हेक्षण संभाव्य प्रार्दूभाव होणाऱ्या भागांमध्ये कसे करावे याचे मार्गदर्शन केले. आरोग्य अधिकारी डॉ. पावरा यांनी अतिरिक्त आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या कार्यप्रणालीची महिती देऊन साथरोगावर निश्‍चितपणे नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे सांगितले. मनिष पवार यांनी प्रास्ताविक केले.
----------------
चौकट
वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक
छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यलयांतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आपत्कालीन परिस्थितीत साथरोग आजाराच्या अनुषंगाने बैठक झाली. जलजन्य आजाराबाबत माहिती देऊन प्रबोधन करणे, पाण्याचा साठा करण्यात येणाऱ्या ठिकाणी तपासणी करणे व तपासणीमध्ये दूषीत पाण्याचे नमुने घेवून प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. त्याचबरोबर आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस पाळणेबाबत नागरिकांना आवाहन करणे, सर्वेक्षण आकडेवारी कार्यालयास कळविणेच्या सुचनाही आतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com