‘अकरावी’च्या दुसऱ्या फेरीत ५४० जणांचे प्रवेश

‘अकरावी’च्या दुसऱ्या फेरीत ५४० जणांचे प्रवेश

‘अकरावी’ प्रवेशाची
तिसरी फेरी आजपासून

कोल्हापूर ः शहरातील २८ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याच्या दुसऱ्या फेरीत एकूण ५४० विद्यार्थ्यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही पूर्ण केली. त्यात विज्ञान विद्याशाखेचे ३१६, तर वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या २२४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेशाची तिसरी फेरी उद्या, बुधवारपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या फेरीअंतर्गत प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. त्यात दिवसभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत १३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चिती प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान, दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यासाठी एसएससी बोर्डाने कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी हेल्पलाईनची सुविधा सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com