पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

Published on

सिनेमासाठी लागणाऱ्या
दीड लाखांच्या साहित्याची चोरी

कोल्हापूरः गोदामाच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने सिनेमासाठी लागणाऱ्या सुमारे दीड लाख रुपयांच्या साहित्याची चोरी केली. याची फिर्याद चित्रपट महामंडाळाचे उपाध्यक्ष धनाजी कोया यमकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, देवकर पाणंद येथील शिवाजीनगर कॉलनीतील यमकर यांच्या प्लॉटमध्ये त्यांचे साहित्याचे गोदाम आहे. २७ ते ३० जून दरम्यान गोदामातून झालेल्या चोरीत सुमारे दीड लाख रुपयांचे वायरचे बंडल चोरीस गेले आहेत. त्यामध्ये दीड हजार फुट लांबीचे काळ्या रंगाचे दोन आणि निळ्या रंगाचे तीन बंडल होते, असेही यमकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
---
दोन लाखाचे कॅमेऱ्याचे साहित्य
असणारी बॅग दोघांनी चोरली

कोल्हापूरः कळंबा परिसरातील कात्यायनी -गिरगाव मार्गावरील मंगल कार्यालयातून सुमारे दोन लाख तीस हजार रुपये किंमतीचे कॅमेऱ्याचे साहित्य असणारी बॅग दोघांनी लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, लग्नसोहळ्यात सहभागी होऊन दोघा चोरट्यांनी किंमती कॅमेऱ्याची बॅग लंपास केली आहे. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कात्यायनी-गिरगाव मार्गावरील एका मंगल कार्यालयात दहा जुलैला ही घटना घडली आहे. कॅमेरामन रुपेश पाटील आणि अमित पाटील यांच्या कॅमेऱ्याच्या बॅगा होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.