प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्प कधी?

प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्प कधी?

प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्प कधी?
महापालिकेचे उत्पन्न वाढणार; नूतन आयुक्तांनी मार्गी लावण्याची अपेक्षा
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.१४ ः शहरात दररोज सुमारे तीन ते साडेतीन टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. त्यामुळे प्रशासनसमोर या कचऱ्‍याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. इचलकरंजी महापालिकेने २०२० मध्ये प्लास्टिक कचरा वितळवून त्याद्वारे इंधन तयार करण्याचा ३.८० कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र तत्कालीन अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे हा प्रकल्प रेंगाळल्याच्या सांगण्यात येते. हा प्रकल्प मार्गी लागला असता तर शहराची प्लास्टिक कचऱ्याची समस्या मार्गी लागण्याबरोबरच महापालिकेला आर्थिक उत्पन्नत ही भर पडली असती. शहाराच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला हा प्रकल्प नूतन आयुक्तांनी मार्गी लावावा अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
इचलकरंजीमध्ये ओला व सुका असा एकूण दररोज सुमारे १२० टन कचरा गोळा होतो. घंटागाडीद्वारे संकलन केले जाते. आसरानगर येथील डेपोवर हा कचरा एकत्रित केला जातो. अनेक वर्षांपासून येथे लाखो टन कचरा साचून आहे. त्याववर प्रक्रिया करून खत निर्मितीसाठी घनकचरा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य आहे. खतनिर्मितीचा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरही प्लास्टिक विघटनाची समस्या कायम आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यात यावा, यासाठी शासन विविध प्रकल्प सुरू करत असते. त्यानुसार स्थानिक प्रशासनास सूचना करीत असते. त्यातून प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी महापालिकेने प्लास्टिक कचऱ्‍यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प सर्वसाधारण सभेसमोर आणला होता. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, मुंबई आणि पर्यावरण मंत्रालयाकडे हा पाठवला होता. मात्र त्यानंतर या प्रकल्पाचे पुढे काय झाले याची ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून येते.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने शहरात सायझिंग, प्रोसेस, कापड व्यापारी यामधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा तयार होत असतो. सध्या हा कचरा पुनर्वापरासाठी शहारा बाहेर पाठवला जातो. प्लास्टिकचा पुनर्वापर प्रकल्प शहरात सुरू झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. त्याबरोबर शहराचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी येणारा खर्चही तीन वर्षांत निघेल, अशी माहिती तज्ञांकडून सांगण्यात येते. त्यामुळे शहरात प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्प सुरू करणे आवश्यक बनले आहे.
-----------
प्रकल्पासाठी वापरात येणारे प्लास्टिक
दूध, तेल, कॅरिबॅगसह सर्व प्रकारच्या आणि जाडीच्या पिशव्या, तेलाचे डबे, हॉटेलमध्ये मिळणारे पार्सलचे डबे, टूथपेस्टचे वेस्टन, ब्रश, औषधाची वेस्टने, पाणी, सॉफ्ट ड्रिंक अशा सर्व प्रकारच्या बाटल्या, शाम्पू, पावडरचे डबे, वेफर्स, बिस्किट, ब्रेड, खाण्याच्या पदार्थांची वेस्टने, कपड्याच्या साबणाची रॅपर्स, कॅसेट, सिडी, कव्हर, खेळणी, फुले, बादली यांसह सर्वच प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू कच्चा माल म्हणून वापरता येणार आहेत.
--------
प्लास्टीकपासूनच्या इंधनाचा बहुउपयोगी वापर
प्लास्टिकपासून निर्मिती होणाऱ्‍या तेलाची ज्वलनशील क्षमता ही डिझेलपेक्षाही अधिक आहे. सुमारे १०० किलो प्लास्टिकपासून ५० ते ६५ लिटरपर्यंत तेल मिळू शकते. २० ते २२ टक्के गॅस मिळतो. हा वायू इंधन म्हणून पुन्हा प्रकल्पात वापरला जातो. तेलाची इंधन म्हणून विक्री करण्यात येते. शिल्लक राहणारी काजळी रबर आणि प्लास्टिक उद्योगाला रंग म्हणून वापरण्यासाठी देण्यात येते.
------------
इचलकरंजी महापालिकेतर्फे प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मुंबई आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता. मात्र प्रकल्पाकरिता आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने प्रकल्प रखडला आहे.
सुनीलदत्त संगेवार,
आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com