खोतवाडी उपसरपंचपदी सुजाता स्वामी बिनविरोध

खोतवाडी उपसरपंचपदी सुजाता स्वामी बिनविरोध

Published on

16760

खोतवाडी उपसरपंचपदी
सुजाता स्वामी बिनविरोध
तारदाळ : खोतवाडीच्या उपसरपंचपदी सुजाता दत्तात्रय स्वामी यांची बिनविरोध निवड केली. उपसरपंच शिल्पा पोवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी सुजाता स्वामी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्वानुमते स्वामी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच विशाल कुंभार होते. निवडीचे कामकाज ग्रामसेवक एन. एस. बोंदर्डे, क्लार्क नानासो कांबळे यांनी पाहिले.
शिल्पा पोवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता स्वामी यांनी अर्ज दाखल केला होता. कोणताही अन्य अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुजाता स्वामी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीचे वृत्त समजताच स्वामी समर्थकांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. निवडीसाठी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे, यासीन मुजावर, शिवलिंग पाटील, अजय डुबल यांचे सहकार्य लाभले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन उपसरपंच स्वामी यांचा सत्कार केला. गजानन नलगे, शिल्पा पोवार, अजय डुबल, नरेंद्र पोटे, राहूल कांबळे, निर्मला खोत, सावंता माने, उत्तम सासणे, संजय चोपडे, वैभव पोवार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.