अक्षर भारत वाचनालय

अक्षर भारत वाचनालय

Published on

अक्षर भारत वाचनालयात
वाचन आठवड्याची सुरुवात
गडहिंग्लज : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील अक्षर भारत वाचनालयात वाचन चळवळीचा एक भाग म्हणून केरळमधील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. पी. एन. पानिकर यांच्या स्मृतीनिमित्त वाचन आठवड्याची सुरुवात करण्यात आली. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शियाली रंगनाथन व डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. ग्रंथपाल सुषमा पोवार यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा देसाई, मिनाक्षी दड्डीकर, छोटूताई देसाई यांची भाषणे झाली. माधुरी पोवार यांनी आभार मानले. जयदीप पताडे, जोमाकांत पाटील, मानवेंद्र पोवार, मेधा देसाई, सुरेखा कुराडे यांच्यासह कर्मचारी व संचालक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.