भिडेंना संरक्षण द्या

भिडेंना संरक्षण द्या

Published on

फोटो क्रमांक : gad184.jpg
16926
गडहिंग्लज : संभाजीराव भिडे यांना विशेष सुरक्षा व्यवस्था मिळावी या मागणीचे निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विष्णू बुट्टे यांना दिले.
------------------------------------------------------
संभाजीराव भिडेंना
विशेष सुरक्षा द्यावी
गडहिंग्लज, ता. १८ : घाटकोपरमध्ये कार्यक्रमप्रसंगी आलेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला. हा प्रकार निषेधार्ह असून यापुढे असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिडे यांना विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या येथील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, हिंदुत्ववादी विचार म्हणजे जातीयवादी विचार मानणाऱ्या व्यक्ती, संघटना भिडे यांना अकारण विरोध करीत आहेत. परंतु भिडे यांनी अशा विरोधाला न जुमानता मार्गक्रमण नेटाने सुरु ठेवले आहे. काही समाजकंटकांना भिडे कळालेले नाहीत. संघटनेचे कार्य त्यांना बोचत आहे. घाटकोपरमधील घटना अशातूनच घडली आहे. असे प्रसंग वारंवार घडत आहेत. यातून काहीजण राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. भिडे यांचे मार्गदर्शन राज्यात व राज्याबाहेरही सुरु आहे. केवळ वैयक्तिक द्वेषापोटी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा येण्याचा संभव आहे. यामुळे शासनाने त्यांना राज्यात व राज्याबाहेर विशेष सुरक्षा व्यवस्था मिळावी.’ सुधीर उर्फ आप्पा शिवणे, सागर कुराडे, मनोज पोवार, राहुल शिंदे, मंथन भडगावकर, शिवाजी बचाटे, शिवाजी पाटील, वसंत शेटके, प्रताप मोहिते, सुदर्शन चव्हाण, मिलिंद मोरे, विनोद गोडसे आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.