अवनि सुका कचरा संकलन

अवनि सुका कचरा संकलन
Published on

16968
कोल्हापूर ः अवनि संस्था आयोजित कचरा संकलन केंद्राबाबत मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी कोल्हापूर, सांगली व सातारा येथील कार्यकर्त्या.

‘अवनि’तर्फे कचरा संकलननिर्मिती कार्यशाळा
कोल्हापूर ः अवनितील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते व कचरा वेचक परिसर भगिनी यांची कार्यशाळा हणबरवाडी येथे झाली. वनिता कांबळे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले व निकिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या पद्धती, घरगुती धोकादायक घातक कचरा, शून्य कचरा म्हणजे काय? कचरा वेचक परिसर भगिनी महिलांचे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाचे योगदान याची माहिती दिली. सुका कचरा संकलन केंद्राची निर्मिती कशी करावी. तसेच घनकचरा व्यवस्थापन २०१६ या कायद्यासंदर्भात या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.