सह्याद्री प्रतिष्ठान मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठान मोहीम

13109
कोल्हापूर : सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित किल्ले पन्हाळा ते विशाळगड पावन परिसर पदभ्रमंती मोहिमेत सहभागी मोहीमवीर.


फरसबंदी मार्गावरील रणसंग्राम
भावी पिढ्यांना ऊर्जा देत राहील
प्रशांत बांदल; ‘सह्याद्री प्रतिष्ठान’तर्फे पदभ्रमंती मोहीम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : पावनखिंड परिसरातील फरसबंदी मार्गावर घडलेला रणसंग्राम भावी पिढ्यांना ऊर्जा देत राहील, असा विश्‍वास बांदल घराण्याचे वंशज प्रशांत बांदल यांनी व्यक्त केला. सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित ‘किल्ले पन्हाळा ते विशाळगड पावन परिसर’ पदभ्रमंती मोहिमेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
बांदलांचे वंशज विठ्ठल बांदल, राजेंद्र बांदल व प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या हस्ते पावनखिंडीतील पालखीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह फरसबंदी मार्गाचे पूजन झाले. तत्पूर्वी, पांढरेपाणी ते पावनखिंडीपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे आयोजन केले होते.
बांदल म्हणाले, ‘‘तत्कालीन ऐतिहासिक देशी साधनांसह परदेशी कागदपत्रांचा अभ्यास केल्याखेरीज खरा इतिहास उजेडात येणार नाही. आमच्या पूर्वजांनी पावनखिंडीत पराक्रमाची शर्थ केली. त्यांची नावे आज लोकांसमोर येत आहेत.’’ इतिहास अभ्यासक मानसिंग चव्हाण यांनी फरसबंदी मार्गाचे महत्त्व स्पष्ट केले.
किल्ले पन्हाळगडावरून मोहिमेस सुरुवात झाली. पन्हाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब मलगुंडे, दिनकर भोपळे यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे, तर साळोखे यांच्या हस्ते शिवा काशीद यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. डॉ. संदीप नेजदार, सुनील पसारे, डॉ. मंगेश पाटील, विशाल भंडारी, किशोर पाटील, प्रणव इंगवले, मोहन पाटील, दिगंबर वावरे, वैभव दळवी यांनी सहकार्य केले. सचिव प्रवीण हुबाळे, संचालक प्रदीप थोरवत, मोहीम प्रमुख चंद्रकांत वाघ, चेतन बिरंजे, सुजित जाधव, राजेंद्र काटकर, विनायक आळवेकर, किरण चाबूकस्वार, अक्षय धुरी, अक्षय पाटील, रोहन भोगले, सागर पाटील, शुभम कोळी, योगेश वेटाळे, गौरव कोळी, प्रवीण केंबळे, केतन कांबळे, संकेत भाताडे, पार्थ जाधव, मेघा माळी, सायली बिरंजे, सई थोरवत यांनी संयोजन केले.
---------------
चौकट
गुणवंतांच्या मातांना साडीचा आहेर
करपेवाडी मुक्कामी शाहीर रंगराव पाटील यांच्या शाहिरीने मोहीमवीरांत ऊर्जा पेरली. मोडी लिपी तज्ज्ञ वसंत सिंघण यांनी मोडीची माहिती दिली. करपेवाडीतील दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मातांना साडीचा आहेर करण्यात आला, तर विद्यार्थ्यांना पुस्तक, बूट, वह्या, पेन्सिली व पेनचे वाटप करण्यात आले. खोतवाडीचा धनगरवाडा, मांडलाईवाडी, माळेवाडी (पणुंद्रे), म्हालसवडे व माणचा धनगरवाडा, भाततळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com