ई - कचऱ्याचे स्वतंत्र संकलन

ई - कचऱ्याचे स्वतंत्र संकलन

Published on

ich188.jpg
17096
इचलकरंजी ः घंटागाडीच्या धर्तीवर आता ई-रिक्षाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे घातक अशा ई-कचरा संकलनास सुरुवात झाली आहे.

ई-कचऱ्याचे स्वतंत्र संकलन
दोन ई-रिक्षा व्यावसायिक क्षेत्रातून फिरणार; नागरिकांची जबाबदारी वाढली

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १८ ः शहरातील घरगुती कचरा संकलनासाठी घरोघरी घंटागाडी जात असते. यात ओला आणि सुका कचरा संकलित केला जातो. आता पर्यावरणासाठी घातक असलेला ई-कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात येत आहे. त्यासाठी शहरात आता दोन ई-रिक्षा प्राधान्याने व्यावसायिक विभागात फिरत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मार्गही निश्‍चित केला आहे. त्यामुळे या ई-रिक्षात घातक असा ई- कचरा टाकण्याची जबाबदारी आता नागरिकांवर आली आहे.
सध्या घंटागाडीतूनच ई-कचरा टाकण्यात येतो. साधारणपणे संगणक, मोबाईल यासह विविध इलेक्ट्रॅानिक्स खराब झालेल्या वस्तूंचा ई-कचऱ्यात समावेश होतो. या कचऱ्याचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणास अत्यंत घातक असा हा ई-कचरा समजला जातो. सध्या साधारणपणे दररोज १०० किलो ई-कचरा जमा होतो. शहरातील दोन बँकांनी आपल्या फंडातून महापालिकेला ई-रिक्षा प्रदान केल्या आहेत. या ई-रिक्षांचा वापर ई-कचरा संकलनासाठी सुरू केला आहे. विशेष करून व्यावसायिक विभाग असलेल्या परिसरात या ई-रिक्षा फिरणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी चार यावेळेत या ई-रिक्षा निश्‍चित केलेल्या मार्गावरून फिरणार आहेत.
---
पुण्यातील कंपनीशी करार
संकलित करण्यात आलेल्या ई-कचऱ्याचा प्रक्रियेद्वारे पुनर्वापर केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने पुणे येथील एका कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडे हा ई-कचरा पुनर्प्रक्रियेसाठी दिला जाणार आहे.
-----
व्यावसायिकांत जागृती करणार
नियमित येणाऱ्या घंटागाडीत ई-कचरा टाकला जातो. आता तो ई-रिक्षात टाकण्यासाठी व्यावसायिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवारा यांनी सांगितले.
------
ई-रिक्षांचा मार्ग असा
मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, झेंडा चौक, नाट्यगृह चौक, पोस्ट ऑफिस, खाऊ गल्ली, गद्रे दत्त मंदिर, फायर ब्रिगेड, धान्य ओळ, लायकर गल्ली, शॉपिंग सेंटर, शाहू कॉर्नर, डंबाळ गल्ली या मार्गावर एक ई-रिक्षा फिरणार आहे. दुसरी ई-रिक्षा ही मलाबादे चौक, प्रांत कार्यालय, शिवतीर्थ, शाहू कॉर्नर, साखरपे हॉस्पिटल, संभाजी चौक, तीन बत्ती चौक, शाहू हायस्कूल रोड, टेलिफोन ऑफिस, बंडगर माळ, शाहू पुतळा, एएससी कॉलेज, स्टेशन रोड, थोरात चौक ते मराठा मंडळ या मार्गावर ई-कचरा संकलित करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.