लम्‍पी आजाराबाबत खबरदारी घ्यावी

लम्‍पी आजाराबाबत खबरदारी घ्यावी

Published on

लम्‍पी आजाराबाबत खबरदारी घ्या ःचव्‍हाण
कोल्‍हापूर,ता.१८: जिल्‍ह्यात पुन्‍हा एकदा गायवर्गीय पशुधनांमध्ये लम्‍पी रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागासासह सर्वच खातेप्रमुखांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. लम्‍पीचे पशुधन आढळले तर तत्‍काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी केली. जिल्‍हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या समन्‍वय बैठकीत ते बोलत होते.
चव्‍हाण म्हणाले, ‘जिल्‍ह्यात आवश्यक पाउस झालेला नाही. त्यामुळे पिकांची परिस्‍थिती पाहून शेतकऱ्यांना काही मदत लागत असेल ती करण्याचे नियोजन कृषी विभागाने करावे. तसेच ज्या तालुक्यात महापुराची भीती आहे, तेथे चारा छावण्या उभारण्याचेही नियोजन करावे. पंचगंगा नदीकाठच्या गावांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे या गावांशी सातत्याने संपर्क करवा.’
समाजकल्याण विभागाकडून पुढील पाच वर्षांसाठी दलितवस्‍तीच्या विकासाचा आराखडा तयार केला जाणार आहे. यात त्रुटी राहणार नाही, तसेच कोणतीही वस्‍ती निधीपासून, विकासापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना चव्‍हाण यांनी केली. स्‍वच्‍छ भारत मिशनअंतर्गत दिला जाणारा निधी अजूनही खर्च झालेला नाही. या खर्चाचे नियोजन करण्यावरही यावेळी चर्चा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.