डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील ४३० विद्यार्थ्यांची निवड

डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील ४३० विद्यार्थ्यांची निवड

Published on

ich257.jpg
18897
इचलकरंजी ः विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेले डीकेटीईचे विद्यार्थी- विद्यार्थिनी.

डीकेटीईच्या इंजिनिअरिंग विभागातील ४३० विद्यार्थ्यांची निवड

इचलकरंजी, ता. २६ ः डीकेटीईच्या टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूटमधील इंजिनिअरिंग विभागातील ४३० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. डीकेटीईमध्ये ७० हून अधिक कंपन्या कॅम्पस इंटरव्हयूसाठी आलेल्या होत्या. त्यातून ४३० विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड केली आहे.
मायक्रोचिप या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये मानस गिडवानी याची ४५ लाख पॅकेजवर निवड झालेली आहे. इटीसी विभागातील जयतीर्थ डंबळ याची न्यूयार्कमधील अकंम्पोनंट आयनसी या कंपनीत २५ लाख पॅकेजवर निवड झाली आहे. कॉम्प्युटर विभागातील २ विद्यार्थ्यांची प्रिसीएंट सिक्युरिटीमध्ये १८.५ लाख पॅकेजवर निवड झाली आहे. याचबरोबर सुमारे १२५ हून अधिक विद्यार्थ्यांना ८ ते १० लाखांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व विश्‍वस्तांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्रभारी संचालिका प्रा. सौ. एल. एस. आडमुठे, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. जी. एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.