गुणवत्तापूर्ण सेवेमुळे ‘रवळनाथ’ची प्रगती; नंदिनी आवडे

गुणवत्तापूर्ण सेवेमुळे ‘रवळनाथ’ची प्रगती; नंदिनी आवडे

Published on

19008
सांगली : रवळनाथतर्फे प्रेमला साळी यांचा सत्कार नंदिनी आवडे यांच्या हस्ते झाला. एम. एल. चौगुले, भास्कर ताम्हणकर, डॉ. बी. एम. हिर्डेकर आदी उपस्थित होते.

गुणवत्तापूर्ण सेवेमुळे
‘रवळनाथ’ची प्रगती
नंदिनी आवडे; सांगलीत सत्कार समारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : ‘रवळनाथ’ने सहकाराच्या माध्यमातून हौसिंग फायनान्स क्षेत्रात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. गुणवत्तापूर्ण सेवा व पारदर्शक कामामुळे ही प्रगती झाली आहे,’ असे प्रतिपादन वरिष्ठ अपर जिल्हाधिकारी नंदिनी आवडे यांनी केले.
श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या सांगली शाखेत आयोजित निवृत्त शिक्षक व गुणवंत पाल्यांचा सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होते. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रेमला साळी, राजकुमार पाटील, चित्रलेखा कांबळे, सुवर्णा कुंभार, विद्युत पोंक्षे, सुनीता माने, डॉ. गायत्री ताम्हणकर, विनया शिंदे यांचा गौरव झाला.
आवडे म्हणाल्या, ‘‘३९६ कोटींच्या ठेवीमुळे रवळनाथवरील ठेवीदारांचा विश्‍वास अधोरेखित होतो. रवळनाथची वाटचाल प्रेरणादायी आहे. सांगलीतील कवठेमहांकाळ, जत हे दूरचे तालुके व शिराळ्याचा डोंगरी भाग अजूनही विकासापासून वंचित आहे. यामुळे ‘रवळनाथ’ने या तालुक्यांकडे विशेष लक्ष द्यावे.’’
प्राचार्य हिर्डेकर म्हणाले, ‘‘महिला, तरुण व वंचितांना उभे करण्याचे संस्थेचे काम उल्लेखनीय आहे. रवळनाथने अल्पावधीत देशाच्या सहकार चळवळीत नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. यामुळे मुंबईच्या डबेवाल्याप्रमाणे एक केस स्टडी म्हणून रवळनाथचा अभ्यास करण्याची गरज आहे.’’ चौगुले यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ‘रवळनाथ’ची पारदर्शक कारभार, नि:स्वार्थी संचालक, सल्लागार, प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे अल्पावधीत प्रगती झाल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव, संचालक डॉ. आर. एस. निळपणकर, शाखा सल्लागार प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, रमेश चराटे, मेघा आलासे, शाखाधिकारी श्रेयस गाडवे आदी उपस्थित होते. शाखाध्यक्ष डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी स्वागत केले. डॉ. दत्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शाखा सल्लागार सतीश हेरवाडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.