एक्सलन्स अवार्ड

एक्सलन्स अवार्ड

Published on

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ‘एक्सलन्स अवार्ड’ स्वीकारताना समीर पाटील, समवेत डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. आर. के. मुदगल.

‘डी. वाय. पाटील’च्या कर्मचाऱ्याचा
‘एक्सलन्स अवार्ड’ने गौरव

कोल्हापूर, ता. २४ : ‘कर्मचाऱ्यांचे योगदान आणि परिश्रमामुळे डी. वाय. पाटील ग्रुपने गरुड भरारी घेतली आहे. ४० वर्षांच्या प्रवासात ग्रुपची प्रगती पाहत आहोत, त्यामागे कर्मचाऱ्यांची मेहनत आहे. या पुढेही डी वाय पाटील ग्रुपला आणखी उंचीवर नेण्यासाठी सर्वांनीच हातात हात घालून एकेदिलाने अधिक चांगले काम करूया, असे आवाहन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी.पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘एक्सलन्स अवार्ड’ प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. संजय पाटील यांनी, डी वाय पाटील ग्रुपच्या या आजच्या वैभवामागे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मोठे परिश्रम आहेत . आजवरच्या प्रवासात असंख्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल प्रातिनिधिक गौरव करताना अतिशय आनंद होत असल्याचे सांगितले.

विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांचे विचार, प्रेरणा, संस्कार पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे सांगितले. विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून मुलांना केवळ उत्तम शिक्षणच नव्हे तर चांगली मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. विश्वस्त तेजस पाटील यांनी डॉ. डी वाय पाटील यांचा शिक्षणाचा वारसा आमची चौथी पिढी आणखी ताकतीने पुढे घेऊन जाईल याची खात्री दिली. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी पाटील कुटुंबीया कडून मिळणारे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळे आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे सांगितले.यावेळी डॉ. राकेश कुमार मुदगल, डॉ राकेश कुमार शर्मा, प्राचार्य डॉ. सुहास पाटील, अमिताभ शर्मा यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रा. अर्पिता तिवारी व प्रा. राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, सीएचआरओ श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, प्राचार्य डॉ.महादेव नरके, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सयाजी हॉटेलचे जनरल मॅनेजर अमिताभ शर्मा, मार्केटिंग हेड सौरभ जगताप, सिनिअर ग्राफिक डिझायनर समीर पाटील यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांना यावेळी एक्सलन्स अवार्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमावेळी डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.