पूरात अडकलेल्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था

पूरात अडकलेल्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था

Published on

पूरात अडकणाऱ्या वाहनांसाठी
पार्किंगची व्यवस्था ः मोरे

कोल्हापूर, ता. २७ ः महापूर आला की सर्वात आधी इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरते. त्यामुळे वाहने बाहेर काढता येत नाहीत. वाहने खराब होतात. हा अनुभव लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसात नदी काठी असणाऱ्या इमारतीतील नागरिकांनी आपली वाहने मोठ्या रस्त्यांच्या कडेला उभी केली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला. पूराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने शहरातील विविध ठिकाणी पुरात अडकण्याचा धोका असणारी वाहने उभी करण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती शहर वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.

वाहने उभी करण्याची ठिकाणे
निर्माण चौक, छत्रपती शाहू हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, पद्माराजे विद्यालय, खराडे विद्यालय रंकाळा, दसरा चौक, केएमसी कॉलेज दुधाळी, शाळा नंबर ९ मैदान, कनाननगर चर्च मैदान, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, जुने विवेकानंद कॉलेज, तोरस्कर चौक, न्यू पॅलेस शाळा मैदान, महावीर कॉलेज परिसर, मेरी वेदर मैदान, प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी आणि समता हायस्कूल बापट कॅम्प.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.