३० दुकाने बंद

३० दुकाने बंद

Published on

19181

धोकादायक इमारतीतील ३० दुकाने बंद
परवाना विभागाची कारवाई; कर्मचारी- व्यावसायिकांमध्ये वादावादी


कोल्हापूर, ता. २६ ः शहरातील धोकादायक इमारतींमुळे पावसात दुर्घटना घडू नये म्हणून महापालिका सतर्क झाली. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी दरम्यानच्या २० इमारतींमधील ३० दुकाने परवाना विभागाने बंद केली. यावेळी महापालिका कर्मचारी व व्यावसायिकांमध्ये वादावादी झाली. इमारत उतरली नसल्याने, दुरूस्त केली नसल्याने त्यांना यापूर्वी नोटीस दिल्या होत्या.
खासबाग मैदानाची भिंत पडून महिला दगावल्याने नागरिकांनी महापालिकेच्या यंत्रणा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. महापालिका वेळवर काही करत नाही, निर्णय घेत नसल्याचे आरोप केले जात आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील धोकादायक इमारती उतरवून घेण्यास सुरवात केली होती. काहींनी दुरूस्ती केली; पण अनेक ठिकाणी धोकादायक इमारत उतरवण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्यामुळे आजूबाजूच्या, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचा हकनाक बळी जाण्याचा धोका होता. त्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांनी मालक, कूळ दोघांनाही नोटीस काढूनही त्या इमारतीतून नागरिक बाहेर पडले नव्हते. त्यामुळे परवाना विभागाला तेथील व्यवसाय बंद करण्यास सांगितले होते. त्यानुसार परवाना विभागाने नोटीस काढल्या होत्या. त्या नोटीसनंतर आज परवाना विभागाचे अधिकारी राम काटकर यांच्यासह दहा कर्मचारी तसेच विभागीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या पथकाने २० इमारतीमध्ये सुरू असलेली विविध प्रकारची ३० दुकाने बंद केली. त्यावेळी मालक-कूळ यांची अधिकारी, कर्मचाऱ्यांशी वादावादीही झाली.

चौकट

पाऊस कमी झाल्यानंतर धोकादायक
इमारती पाडण्याचे नियोजन

पाऊस कमी झाल्यानंतर महाद्वार रोड तसेच गजबजलेल्या परिसराती धोकादायक इमारती पाडण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. अनेक इमारतींजवळ इतर व्यावसायिक आहेत, तिथे नागरिकांची भरपूर वर्दळ असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी त्या इमारती पाडल्या जातील अशी शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.