इचल : पूरस्थीती

इचल : पूरस्थीती

Published on

इचलकरंजीत पंचगंगेच्या पातळीत एक इंचाने वाढ
इचलकरंजी ः येथील पंचगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत दिवसभरात केवळ एक इंच वाढ झाली. त्यामुळे संभाव्य पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तथापि, महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार काही नागरिकांनी नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतर केले. तसेच जनावरेही सुरक्षीतस्थळी हलवली होती. सध्या ६५.१ इंचावर पाणी पातळी स्थिर राहिली आहे. त्यामुळे प्रशासनानेही सुस्कारा टाकला आहे. गेल्या काही दिवसांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. त्यातच राधानगरी धरणाचे दरवाजे उघ़डल्यास पुराचे पाणी नागरी वस्तीत येण्याची भिती व्यक्त होती. त्यामुळे पूरबाधित क्षेत्रातील नागरिक धास्तावले होते. सतर्कता म्हणून काही नागरिक आपल्या नातेवाईकांकडे साहित्यांसह स्थलांतरीत झाले. त्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. काहीजणांनी जनावरांची व्यवस्था नाट्यगृह परिसरात केली. सध्या नाट्यगृहातील महापालिकेने सुरु केलेली छावणी रिकामीच आहे.सध्या नागरी वस्तीजवळ पाणी आलेले नाही. त्यामुळे स्थलांतराची प्रक्रीया तुर्तात थांबली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.