नाल्या हैदर पंजा भेट

नाल्या हैदर पंजा भेट

Published on

19190


नाल्या हैदर पंजा भेटीसाठी पडला बाहेर
पांरपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक; अन्य पंजांच्या भेटी आजपासून

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. २५ ः पांरपरिक वाद्यांचा गजर व लवाजम्यासह बाबूजमाल दर्गा तालिम मंडळाचा नाल्या हैदर पंजा भेटीसाठी रात्री उशिरा मिरवणुकीने बाहेर पडला. भर पावसात पण मशालीच्या लखलखत्या उजेडात पंजा भेटीचा पारंपरिक विधी झाला. मिरवणुकीत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बाबूजमाल दर्गा येथे पंजाची विधीवत पूजा झाल्यानंतर पंजा भेट मिरवणूक निघाली. बाबू जमाल दर्गा, ताराबाई रोड मार्गे महाद्वार रोड मार्गे हा पंजा जुना राजवाडा येथे आला. येथे वाळव्याची स्वारी पंजाची भेट घेऊन मिरवणूक बाराईमाम पंजा भेटीसाठी मार्गस्थ झाली. त्यानंतर शिवाजी चौक येथील घुडणपीर दर्गा येथे पंजा मिरवणूक आली. यावेळी घुडणपीर दर्गा विश्वस्तांनी स्वागत करीत पंजा भेट विधीवत घडविली. येथील भेटीनंतर नाल्या हैदर पंजाची मिरवणूक शिवाजी चौक, महापालिका, पापाची तिकीटी, महाद्वार रोड मार्गे रात्री उशिरा बाबूजमाल दर्गा येथे गेली. येथे मिरवणुकीची सांगता झाली.
दरम्यान बिंदू चौकातील ७२ वर्षापूर्वी स्थापन झालेला मलिक रेहान मिरासाहेब पंजा उद्या गुरूवारी (ता. २७) दुपारी चार वाजता थाटामाटात भेटीसाठी निघणार आहे. यावेळी भाविक उपस्थित राहणार असल्‍याची माहिती पंजा सेवकांनी दिली आहे, तर राजारामपुरीतील मानाचा मोठा हसरत पिराने पीर झिमझिमसाहेब राजारामपुरीतील जनता बझार चौकातून भेटीसाठी सायंकाळी ५ वाजता निघणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.