नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा विकास : कुराडे

नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा विकास : कुराडे

20139
गडहिंग्लज : शिवराजमधील कार्यक्रमात डॉ. अनिल कुराडे यांनी शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. एस. एम. कदम, डॉ. अशोक मोरमारे, संदीप कुराडे, जी. जी. गायकवाड आदी उपस्थित होते.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे
विद्यार्थ्यांचा विकास : कुराडे
शिवराजमध्ये शैक्षणिक धोरण सप्ताहाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि विद्यार्थ्यांच्या विकासाला प्राधान्य देणारे आहे, असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते.
डॉ. कुराडे म्हणाले, ‘‘बदलत्या परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहण्यासाठी हे शैक्षणिक धोरण गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले करिअर समृद्ध करावे. भारतीय विद्यार्थीही जगाच्या स्पर्धेत टिकला पाहिजे यादृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला महत्त्व दिले आहे.’’
प्राचार्य डॉ. कदम म्हणाले, ‘‘शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना विविध कोर्सेस शिकण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.’’ या सप्ताहात राबविलेल्या उपक्रमाबाबत श्रीधर माळगी, पौर्णिमा कुंभार, ऋतुजा कानडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. एम. हसुरे, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, डॉ. जी. जी. गायकवाड यांच्यासह सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. अशोक मोरमारे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल संदीप कुराडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com