इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात

इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात

20182
गडहिंग्लज : इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. याप्रसंगी समाधान घुगे, सतीश पाटील, प्रकाश पाटील, उषा मांगले आदी उपस्थित होते.

इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना
ऐनापूरमधून मदतीचा हात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : इर्षाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला. ऐनापूरच्या सरपंच उषा मांगले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. दुर्घटनाग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे ४३ किट तयार केले होते. ऐनापूर येथील कार्यकर्त्यांनी थेट दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन ही किट दिली. तसेच त्यांना मानसिक आधारही दिला.
इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी ऐनापूरसह परिसराच्या गावातील अनेकजण पुढे आले. कोणी तांदूळ दिले, कोणी साखर, कोणी गहू दिले, तर कोणी आर्थिक स्वरूपात मदत केली. जमलेल्या साहित्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून ४३ किट तयार केली. एका कुटुंबाला किमान महिनाभर पुरेल इतके हे साहित्य आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत मदत पाठविली. निवृत्ती ऊर्फ पिंटू मांगले, सतीश देसाई, शिवराज पाटील, संजय जाधव, अविनाश सनदी, राहुल मासोळे, रामदास देसाई यांनी दुर्घटनाग्रस्तांकडे मदत सुपूर्द केली.
सचिन देसाई (हिरलगे), मिलिंद मगदूम, तानाजी रानगे (बेळगुंदी), प्रकाश पाटील, संजीवनी माने, मानतेश पाटील (अत्याळ), संजय बटकडली (कडगाव), बसवराज आरबोळे (तनवडी), आनंदा जाधव (कडलगे), संजय कांबळे (हसूरवाडी), अॅड. परमेश्वरी पाटील (लिंगनूर), विलास देशपांडे (इंचनाळ), प्रतीक क्षीरसागर, नितीन हुद्दार, राहुल शिंदे, जयदीप मगदूम, न्यू दसरा चौक चालक-मालक संघटना यांनी मदतीचा हात पुढे केला. लहूकुमार दड्डीकर, सुनील स्वामी, टी. एस. देसाई, निखिल स्वामी, विलास सूर्यवंशी, पांडुरंग चौगुले, विकास पाटील, सौरभ पाटील यांनी मदत जमा करण्यास सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com