बदामी निलंबित

बदामी निलंबित

कार्यकारी अभियंता विनया बदामी निलंबित

काळम्मावाडीच्या अनियमितताप्रकरणी शासनाची कारवाई

कोल्हापूर, ता. ३१ ः काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या कालवा कामात झालेल्या अनियमितताप्रकरणी दुधगंगा कालवा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता विनया बदामी यांना आज निलंबित करण्यात आले. शासनाचे सहसचिव सु. दि. गायकवाड यांनी यासंदर्भातील आदेश आज काढले.
काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मातीकाम, बांधकाम, अस्तरीकरणाच्या कामाचे देयक नियमबाह्य व सुधारित तांत्रिक मान्यता न घेता दिल्याचा आरोप विधानसभेच्या अधिवेशनात आमदार प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधीद्वारे केला होता. या कामाची ४० कोटी रूपयांची रक्कम ठेकदारास मान्यतेशिवाय दिल्याचे यात स्पष्ट झाले होते. या प्रकरणाला जबाबदार धरून बदामी यांना निलंबित करण्याची मागणी आबिटकर यांनी केली होती. त्यानुसार विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आश्‍वासन दिले होते. या पार्श्‍वभूमीवर विनया बदामी यांना आज निलंबित करण्यात आले. निलंबनाच्या काळात बदामी यांचे मुख्यालय पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात असेल. अधीक्षक अभियंता यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com