गडहिंग्लज नगरपालिकेचा 
आज १३६ वा वर्धापनदिन

गडहिंग्लज नगरपालिकेचा आज १३६ वा वर्धापनदिन

गडहिंग्लज नगरपालिकेचा
आज १३६ वा वर्धापनदिन
गडहिंग्लज, ता. ३१ : येथील नगरपरिषदेचा उद्या (ता. १) १३६ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. यानिमित्त पालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक स्वरुप खारगे यांनी केले आहे.
सकाळी रॅली व संचलन सोहळा होणार आहे. कर्मचाऱ्यांचा विमा वितरण, ई-प्लेज आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार आहे. कर्मचाऱ्यांतर्फे फनी गेम्स व सांस्कृतिक सोहळाही रंगणार आहे. माझी वसुंधरा अभियानात राज्यस्तरावर मिळालेल्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन खारगे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com