मनपा बैठक

मनपा बैठक

20254

कामगार चाळींची आज होणार
स्ट्रक्चरल इंजिनिअरसोबत पाहणी

पुनर्वसनाबाबत नंतर निर्णय; महापालिकेत बैठक

कोल्हापूर, ता. ३१ ः संभाजीनगर येथील धोकादायक सर्व कामगार चाळींची उद्या (ता. १) महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरसोबत पाहणी करून स्थलांतराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यावेळी चाळीतील कामगार, माजी नगरसेवक, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
धोकादायक इमारती असल्याने महापालिकेने संभाजीनगर येथील कामगार चाळी रिकामी करण्याच्या नोटीस संबंधित कामगारांना दिल्या. त्यानंतर कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. कोणत्याही स्थितीत खोल्या रिकामी करणार नाहीत, असा इशारा दिला होता. त्यासाठी इस्टेट विभागाने चाळीतील कामगारांची महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात बैठक आयोजित केली होती. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत कामगार, माजी नगरसेवकांनी मते मांडली. माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी इमारतीच्या पुनर्वसनाबाबत सतत पाठपुरावा केल्याचे सांगितले. त्याबाबत निर्णय झालेले नाहीत. किरण नकाते यांनी महापालिकेने याबाबतचा आराखडा स्पष्ट करावा असे सांगितले. यावेळी ज्या इतर ठिकाणच्या चाळी आहेत, तेथील रिकाम्या खोल्यांमध्ये स्थलांतरीत करण्याबाबतही चर्चा झाली. तुलनेने सुस्थितीत असलेल्या दोन इमारतीमध्ये तीन इमारतीमधील कामगारांना हलवण्याबाबतही चर्चा झाली. त्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता इमारतींची पाहणी करून पुर्नवसनाबाबत पुढील निर्णय घेण्याचे ठरवले. शहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, मकरंद जोशी, सुनील गोहीरे, जयवंत गोंडाळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com