गोकुळ शौमिका महाडिक

गोकुळ शौमिका महाडिक

गोकुळ पॅकिंग केंद्रात नेत्याची गुंतवणूक
शौमिका महाडिक ः ८०० संस्थांची नोंद; मग दूधसंकलन घटले कसे?

कोल्हापूर, ता. ३० : न्यायालयाने पुण्यातील पॅकिंग केंद्राची जबाबदारी पूर्वीच्याच कंपनीला दिली. तरीही, कोल्हापुरातील एका नेत्याची गुंतवणूक असणाऱ्या एका दुसऱ्या पॅकिंग केंद्राकडेच हे काम राहावे यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. सतेज पाटील यांनी न्यायालयीन लढा गोकुळच्या पैशात न लढता स्वखर्चाने लढावा, असा सल्ला देत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’वर कारवाई होणार नाही, असे जरी सांगितले तरी वरच्या राजकारणाचा गोकुळच्या चौकशीवर परिणाम होणार नाही. लेखापरीक्षण अहवाल न्यायालयात आहे. याचा लवकरच निकाल लागेल. ८०० दूध संस्था वाढूनही दूध संकलनात घट कशी, असा खडा सवाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या संचालिक शौमिका महाडिक यांनी केला. येथील खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
महाडिक म्हणाल्या, ‘मुंबईमधील दूधविक्री वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पुण्यातही हीच परिस्थिती झाल्यास फटका बसेल. सतेज पाटील यांच्या हट्टासाठी आणि इर्षेसाठी पुण्यातील पॅकिंग केंद्र बदलले जात आहे. पुण्यात ३५ वर्षं काम केलेल्या वितरकांना हटवून तेथे पै-पाहुणे घातले आहेत. नव्या लोकांचा संपर्क नसल्याने वितरण व्यवस्था ढासळेल. याविरोधात काही वितरक न्यायालयात गेले. वितरकांना काम करू द्यावे. करार झाल्याशिवाय वितरक, पॅकिंग सेंटरवाल्यांना हटवू नये, असे न्यायालयाने सांगितले. मात्र त्यांनी नियम पायदळी तुडवले.
पुण्यातील किकवीतील नवीन पॅकिंग केंद्रात एका नेत्याचे पैसे गुंतले आहेत. विश्‍वासार्हता नसलेल्या वेंडरला पॅकिंग केंद्र उभारण्यास परवानगी दिली. काहीही झाले तरी नेत्याने, काही अधिकाऱ्यांनी पुण्यात पॅकिंग केंद्र उभारणीचा घाट घातला. आता छुपे खर्च वाढत आहेत. तेथील वितरक नाराज आहे. त्यामुळे स्वत:चे पैसे खर्च होत असून तोटा होतोय; असे लक्षात आल्यानंतर नेता प्रकल्प गोकुळला विक्री करू शकतो.
-----------
चौकट
ःः...गोकुळ अजून विकत घेतला नाही
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये गोकुळची बैठक घेतली जाते. संचालक, अधिकारी गोकुळची कागदपत्रे घेऊन खासगी ठिकाणी जातात. पण, डी. वाय. पाटील ग्रुपने अजून गोकुळ विकत घेतलेला नाही, असाही टोला महाडिक यांनी लगावला.

‘महाडिक म्हणाल्या’
- घानवडेत २४ दूध संस्थांपैकी १९ संस्था गोकुळला दूध पुरवितात. मात्र एक एक संस्था पन्नासऐवजी वीस ते पंचवीस लिटरच दूध पुरवितात. अशा संस्था मतांसाठीच तयार केल्या का?
- जिल्ह्यात ८०० नवीन दूध संस्थांची नोंद केली. तेथून दूध येत असेल तर संकलनात घट कशी? जादा संस्थांची नोंद असेल तर त्यांचे दूध कोठे आहे?
- म्हैस दूधात ७ लाख ९८ हजार ४६६ लि. घट आहे. मुंबईत १६ लाख ९४ हजार ३२१ लि. घट आहे. हे चिंताजनक आहे. विक्रीत पुण्यात २ लाख ११ हजार ३३३ वाढ झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com