शहर वाहतूक शाखेकडून वाहन चोरीचे ८ गुन्हे उघड

शहर वाहतूक शाखेकडून वाहन चोरीचे ८ गुन्हे उघड

शहर वाहतूक शाखेकडून
वाहन चोरीचे ८ गुन्हे उघड

कोल्हापूर, ता. ३१ ः शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतुकीच्या नियमांचे पालन हाोण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी, अधिकारी काम करत असतात. आपले नियमित काम करत असताना या कर्मचाऱ्यांनी वाहन चोरीचे आठ गुन्हेही उघडकीस आणले आहेत.
याबाबत शहर वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, संदीप कापसे हे २४ जूनला सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप या मार्गावर कर्तव्य बजावत होते. यावेळी अनिरुद्ध सुरेश घोडके (वय ३६) याला अडवले आणि चौकशी केली असता ती दुचाकी दुधाळी येथून चोरली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कापसे हे गुरुवारी (ता.२७) स्वयंभू चौक येथे कर्तव्यावर असताना खालीद शकुर खोचीकर (वय २८, रा.घोरपडे गल्ली, मलबार हॉटेलजवळ) हा आला असता त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने शाहूपुरी भाजी मंडई येथून दुचाकी चोरल्याचे लक्षात आले. फैय्याज अत्तार हे शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्तव्यावर असताना येथील महालक्ष्मी चेंबर्स येथील पार्किंगमध्ये एका युवतीला दुसऱ्या युवतीच्या सॅकमधील मोबाईल चोरताना पकडले. वाहतूक शाखेचे राहुल दळवी हे पार्वती मल्टिप्लेक्स येथील पॉइंटवर कार्यरत होते. यावेळी एका दुचाकीस्वाराला त्यांनी अडवले. त्यावेळी तो चालक दुचाकी तेथे सोडून लायसन्स घेऊन येतो, असे सांगून निघून गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही. या दुचाकीची माहिती काढल्यावर ती चोरीची असून, याबाबतचा गुन्हा लक्ष्मीपुरी येथे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
वाहतूक शाखेचे कर्मचारी बाळासाहेब कोळेकर हे बुधवारी (ता.१२) सी.बी.एस पोलिस चौकी येथे कार्यरत होते. त्यावेळी नंबर प्लेट नसणारी एक दुचाकी आली. त्यावर तीन युवक बसले होते. कोळेकर यांनी त्यांना थांबवले, मात्र ते तिघेही दुचाकी तेथेच सोडून गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले. या दुचाकीची अधिक माहिती घेतली असता ती पिंपरी-चिंचवड येथून चोरली होती. सहायक फौजदार ए.बी. चव्हाण यांनी रविवारी (ता.१६) परिख पूल येथून पेट्रोलची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल अमर उबाळे हे रेल्वेस्थानक परिसरात ड्यूटीवर होते. यावेळी तेथील एक बेवारस दुचाकी त्यांनी ताब्यात घेतली. तपास केल्यावर ही दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले.
---
दुभाजक काढल्याने वाहतूक सुरळीत

वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल प्रसाद केरकर हे ताराराणी चौक ते शाहू टोल नाका या रस्त्यावर ड्युटी करत होते. यावळी तेथील दुभाजक वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करून येथील दुभाजकाची लांबी कमी करायला लावली. दोन दिवस त्यांनी स्वतः येथे थांबून काम करून घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com