

gad143.jpg
23380
गडहिंग्लज : प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे झालेल्या कार्यक्रमात बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी ना. ह. जोशी, मधुकर येसणे, सुभाष निकम, आनंदा आजगेकर, नंदकुमार वाईंगडे उपस्थित होते.
-------------------------
टाईम मॅनेजमेंट महत्वाचे
बाबासाहेब वाघमोडे : प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : सुसंस्कारीत पिढी निर्माण करुन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे. आयुष्यात वेळेला मोठे महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनापासूनच टाईम मॅनेजमेंटवर काम करावे, असा सल्ला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिला.
येथील पी. सी. पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व निवृत्त शिक्षकांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम झाला. यावेळी श्री. वाघमोडे बोलत होते. ना. ह. जोशी अध्यक्षस्थानी होते. पतसंस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व निवृत्त शिक्षकांचा सत्कार झाला. मधुकर येसणे, सुभाष निकम, नंदकुमार वाईंगडे यांचीही भाषणे झाली. नंदकुमार येसादे, संभाजी जाधव आदी उपस्थित होते. राजकुमार शिंगटे यांनी स्वागत केले. उपसभापती आनंदा आजगेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. रामचंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय शिंदे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.