शिवराज्याभिषेक जनता बॉण्डचे लोकार्पण

शिवराज्याभिषेक जनता बॉण्डचे लोकार्पण

Published on

ajr161.jpg....
23722
आजरा ः येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात शिवराज्याभिषेक जनता बॉण्डचे लोकार्पण मारुती मोरे आदिंनी केले.
--------
शिवराज्याभिषेक जनता बॉण्डचे लोकार्पण
जनता गृहतारण संस्था ः शिवराज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १८ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येथील जनता गृहतारण संस्थेतर्फे शिवराज्याभिषेक जनता बॉण्डचे लोकार्पण केले. येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात संस्थेची सहविचार सभा झाली. यावेळी बॉण्डचे लोकार्पण केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती मोरे सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
सांगली शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. एन. ए. कुलकर्णी यांचा सत्कार केला. श्री. मोरे म्हणाले, ‘केवळ ठेवी जमा करणे, कर्ज वाटप करणे हे संस्थेचे कधीही उद्दीष्ट नव्हते. ग्राहकांची आर्थिक सेवा करणे व समाजसेवा हेच संस्थेचा मुख्य उद्देश आहे.’ संस्थेतर्फे जाहीर केलेल्या विविध योजनांबाबत चर्चा झाली. प्रकाश पोवार, शिवाजी पाटील, प्रकाश शिंदे, आनंद चव्हाण, डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. सुधीर दोरुगडे, तानाजी पाटील यांची भाषणे झाली. व्यवस्थापक मधुकर खवरे, प्रशासन अधिकारी मारुती कुंभार आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी स्वागत केले. संचालक डॉ. अशोक बाचुळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com