बॅक ऑफ बडोदा तर्फे फाळणी त्रासिका स्मरणदिन साजरा

बॅक ऑफ बडोदा तर्फे फाळणी त्रासिका स्मरणदिन साजरा

M24006
बँक ऑफ बडोदातर्फे फाळणी त्रासिका स्मरणदिन
कोल्हापूरः बँक ऑफ बडोदाच्या छत्रपती शिवाजी चौक शाखेत फाळणीसंबंधीचे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उद्‌घाटन बँकेचे अधिकारी, स्वातंत्र सैनिक, माजी सैनिक व वरिष्ठ नागरिकांच्या हस्ते झाले. बँक ऑफ बडोदा क्षेत्रीय कार्यालयातील उपक्षेत्रीय प्रबंधक डॉ. देविदास पालवे, अधिकारी मोहसीन शेख यांनी प्रदर्शनाबद्दल आणि फाळणी त्रासिका स्मरणदिनाबद्दल मार्गदर्शन केले. देशाच्या फाळणीचे दुःख कधीही विस्मरणात टाकले जाऊ शकत नाही. केवळ घृणा आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो भावा-बहिणींना विस्थापित व्हावे लागले आणि जीवही गमवावा लागला. त्याच लोकांचा संघर्ष आणि बलिदानासाठी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी त्रासिका स्मरणदिन’ म्हणून पाळण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बँक ऑफ बडोदाकडून सर्व उपस्थितां मान्यवरांना हरित चळवळ जपण्याचा संदेश रोप देऊन दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com