

ajr171.jpg....
4017
कोल्हापूर ः येथील जे. पी. नाईक पतसंस्थेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केले. यावेळी डॉ. शिवशंकर उपासे, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. एच. व्ही. देशपांडे, सुभाष विभुते, सुनिल पाटील, रविंद्र कुंभार आदी उपस्थित होते.
--------
नाईक पतसंस्थेचा सहकारात आदर्श
डॉ. बी. एम. हिर्डेकर ः कोल्हापूर शाखेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १८ ः सहकार क्षेत्रात जे. पी. नाईक पतसंस्थेने वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पतसंस्थेची कोल्हापूर शाखा उन्नतीच्या मार्गावर राहील, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभाग प्रमुख डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त केली.
जे. पी. नाईक पतसंस्थेची कोल्हापुरातील शाहुपूरी चौथी गल्लीमध्ये शाखा सुरु झाली. याचे उद्घाटन जिल्हा बॅंकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांच्याहस्ते झाले. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण प्रा. आबिटकर यांनी केले. आजरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे प्रमुख उपस्थित होते.
जेष्ठ नागरीक, दिवंगत आजी व माजी सैनिक व महिलांसाठी ठेवीवर १३ महिन्यासाठी साडे नऊ टक्के व्याजदर दिला जाईल, अशी घोषणा केली. आबिटकर म्हणाले, ‘आजरा तालुक्यात सगळ्याच सहकारी संस्था उतमप्रकारे चालल्या आहेत. यामध्ये जे. पी. नाईक या पसंस्थेचे अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल.’ प्राचार्य डॉ. देशपांडे यांचे भाषण झाले. उपाध्यक्ष सुभाष विभुते, संचालक शिवाजी कांबळे, रविंद्र देसाई, दयानंद उपासे, मनोज गुंजाटी, पुष्पलता घोळसे, डॉ. अंजनी देशपांडे, बसाप्पा आरबोळे, शिवाजीराव होडगे आदी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कोल्हापूर शाखेमध्ये एकाच दिवशी ५४ लाखांच्या ठेवी जमा झाल्याचे सांगीतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.