विना परवाना मंगल कार्यालयाबाबत तक्रार
जिल्हा परिषद ... लोगो
...
मंगल कार्यालय कर
वसुलीप्रकरणी तक्रार
केर्ली ग्रामपंचायतीमधील प्रकार; कारवाईची मागणी
कोल्हापूर, ता.१८: केर्ले (ता.करवीर) येथे सात, आठ वर्षे विनापरवाना मंगल कार्यालय सुरु आहे. याबाबत तक्रार करुनही संबंधित ग्रामविकास अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. परिणामी शासनाच्या महसुलावर याचा परिणाम होत असून, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सुहास पाटील यांनी ग्रामपंचायत विभागाकडे केली आहे.
या मंगल कार्यालयाबाबत करवीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याकडे २०१४ पासून ते आजअखेर असणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची माहिमी मागवण्यात आली होती. या संबंध काळात चार ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. यापैकी कोणीही मंगल कार्यालयाची नोंद घालून, कर आकारणी केलेली नाही. त्यामुळे गेल्या सात, आठ वर्षात जमा न झालेल्या मंगल कार्यालयाच्या कराची वसुली संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
विनापरवाना मंगल कार्यालयाबाबत पंचायत समितीकडेही तक्रार करण्यात आली. मात्र त्यांनीही दुर्लक्ष करत विनापरवाना काम करणाऱ्यांना अभय देण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी दोषी असणाऱ्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही करण्यात आली आहे.
...
‘केर्ली (ता. करवीर) येथील मंगल कार्यालयाचे बांधकाम, कर आकारणीबाबत तक्रार आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा करण्यात आली असून ग्रामपंचायतीचा खुलासा व तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

