

‘जागृती’त उद्या मुत्ररोग उपचार शिबीर
गडहिंग्लज : येथील विद्या प्रसारक मंडळ व डॉ. घाळी प्रतिष्ठानतर्फे मगदूम एण्डो सर्जरी इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने रविवारी (ता. २०) मोफत मुत्ररोग निदान व उपचार शिबीर होणार आहे. डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम होत आहे. जागृती हायस्कूलमध्ये सकाळी नऊ ते तीन या वेळेत शिबीर होईल. किडनी स्टोन, प्रोस्टेट, लघवीतून रक्त जाणे, थंडी व ताप येणे, किडणी खराब होणे, अंगावर सूज येणे आदी आजाराबाबत मोफत उपचार होणार आहेत. गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
----------------------------------------------
gad182.jpg :
24182
विरेन नाईक
मॅरेथॉनमध्ये विरेन नाईक प्रथम
गडहिंग्लज : कागल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाने घेतलेल्या मॅरेथॉनमध्ये मुत्नाळच्या एस. डी. हायसकूलचा विद्यार्थी विरेन नाईक याने १४ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळवला. त्याला रोख १००१ व प्रमाणपत्र देवून गौरवले. प्राचार्य मनोहर गुलगुंजी, पर्यवेक्षक उमेश सावंत यांनी त्याचा सत्कार केला. संस्थाध्यक्ष सतीश घाळी व संचालकांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक सचिन मगदूम यांचे मार्गदर्शन मिळाले.
--------------------------------------------------
एस.डी. प्रशालेत केशरचना स्पर्धा
गडहिंग्लज : मुत्नाळ येथील एस. डी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये केशरचना स्पर्धा झाली. आठवी ते दहावीच्या २० विद्यार्थीनींनी यामध्ये सहभाग घेतला. उपलब्ध असलेल्या साहित्यातून आकर्षक व सुंदर केशरचना विद्यार्थिनींनी तयार केली होती. मुलींमधील कौशल्य गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा घेण्यात आल्या. परीक्षक म्हणून रेश्मा तांबे यांनी काम पाहिले. पार्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीरंग तांबे प्रमुख पाहुणे होते. प्राचार्य मनोहर गुलगुंजी, माजी सैनिक निजगोंडा पाटील, आप्पासाहेब मांजरी, बसवंत चनवीर, पर्यवेक्षक यु. पी. सावंत आदी उपस्थित होते. वैशाली कागवाडे, कल्पना पाटील, पार्वती पाटील यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.