गोकुळ

गोकुळ
Published on

24266

‘गोकुळ’मुळे दुग्ध व्यवसायाला चालना
आमदार विक्रमसिंह सावंत : सांगली जिल्ह्यातील पहिल्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलर उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : गोकुळच्‍या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटमुळे आटपाडी तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे मत जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केले. पात्रेवाडी (ता. आटपाडी) येथील विजयनगर दूध संस्थेत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्‍या हस्ते आणि आमदार विक्रमसिंह सावंत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली क्लस्टर बल्क मिल्क कुलरचे उद्‍घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
आमदार सावंत म्‍हणाले, ‘‘आटपाडी तालुक्यातील दुग्‍ध व्‍यवसाय वाढलेला नाही. पाण्‍याची कमतरता व भौगोलिक स्थितीमुळे दुग्ध व्यवसायाला गती मिळाली नाही. गोकुळने आपल्या विविध योजना राबवून दूग्ध व्‍यवसायाचे स्‍वरूप बदलण्याची किमया केली आहे. त्‍यामुळे ‘गोकुळ’ची सांगली जिल्ह्यातील दूध उत्‍पादकांत वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. ‘गोकुळ’मुळे आटपाडी तालुक्यातील तसेच परिसरातील दुग्धव्यवसायाला चालना मिळणार आहे.’’
श्री. डोंगळे म्हणाले, ‘‘गोकुळ उभारण्यात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मोलाचे सहकार्य आहे. त्यांनी योग्य दिशा दाखवल्यामुळेच संघ चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकला. सांगली जिल्ह्यातील हे पहिले बल्क कुलर आहे. हा भाग दुष्काळी असला तरी येथील दुधाची गुणवत्ता पाहता भविष्यात येथे दूध संकलनाची संधी आहे.’’
गोकुळचे संचालक किसन चौगले, संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, हणमंतराव गायकवाड, प्रकाश पाटील, राजेंद्र मोरे व वसंतदादा दूध संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, वसंत गायकवाड, हर्षवर्धन देशमुख, संतोष पुजारी, तानाजी पाटील, जयदीप भोसले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com