

प्रधान किरुळकर, पूर्वा शेवाळे प्रथम
रेड रिबन मॅरेथॉन स्पर्धा ः आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त‘सीपीआर’मध्ये आयोजन
कोल्हापूर, ता. १८ ः आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘सीपीआर’मध्ये महाविद्यालयीन मुलांसाठी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रधान किरुळकर (अवचितवाडी, ता. राधानगरी) व मुलींमध्ये पूर्वा शेवाळे (टाकवडे, ता. हातकणंगले) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर उपस्थित होते.
सीपीआर -महावीर महाविद्यालय -रमणमळा पोस्ट ऑफिस मार्गे पुन्हा सीपीआर या मार्गावर ही स्पर्धा झाली. शिपुरकर म्हणाल्या, ‘‘युवा वर्ग हा एचआयव्ही नियंत्रणाच्या बाबतीत महत्त्वाचा घटक असून, या वर्गामध्ये जनजागृती होणे अतिशय महत्त्वाचे आहे.’’
शिवछत्रपती पुरस्कार विजेते एस. व्ही. सूर्यवंशी, आर. व्ही. शेटगे, आर. डी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी उपस्थितांना शपथ दिली. अमोल आळवेकर, विक्रम शेलार, चिन्मय जोशी, स्वप्निल पाटील, रोहन माने, पाटील मंगोरे यांनी पंच म्हणून काम केले. प्रथम क्रमांक विजेते स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत. कपिल मुळे, क्रांतिसिंह चव्हाण, राजेश गोधडे, संदीप पाटील, प्रेमजित सरदेसाई, सतीश पाटील, दीपक सावंत, संजय गायकवाड, अभिजीत रोटे, वैशाली पाटील, सुरेखा माने, शिल्पा अष्टेकर, पल्लवी देशपांडे, मनिषा माने यांनी संयोजन केले.
-----
स्पर्धेचे विजेते
मुली-
प्रथम - पूर्वा शेवाळे, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडी
द्वितीय - भाग्यश्री म्हेत्रे, अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी.
तृतीय - सानिका कल्लोळे, व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी.
मुले
प्रथम - प्रधान किरुळकर, विठ्ठलराव पाटील महाविद्यालय
द्वितीय - अभिषेक देवकाते, नाईट कॉलेज
तृतीय - आदिनाथ रायकर, भोगावती महाविद्यालय, कुरुकली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.