गझलसाद

गझलसाद
Published on

24231

गझलकारापेक्षा गझल
मोठी झाली पाहिजे ः मोमीन

कोल्हापूर, ता. १५ : गझल लेखनामध्ये गझलकारापेक्षा त्याची गझल मोठी होणे गरजेचे आहे, तंत्राबरोबरच मंत्राचे महत्त्व अधिक असल्याने रचनेबरोबरच आशयामध्येही विविधता असावी. योग्यप्रकारे आशय पोहोचवण्यासाठी नेमक्या शब्दरचनेसाठी भाषेच्या विविध अंगांची साधना आवश्यक असते, असे मत प्रसिद्ध गझलकार व सुलेखनकार खलील मोमीन यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘गझलसाद’ या समूहाने ‘घर नागेशकराचे’ येथे आयोजित केलेल्या ‘माझी गझलसाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. समूहाचे निमंत्रक नरहर कुलकर्णी यांनी स्वागत केले. त्यानंतर ‘कुंकवाचे कुंपण’ या गझलकार मोमीन यांच्या नव्या गझल संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. संग्रहासंबंधीचे अशोक वाडकर यांचे परिचयात्मक टिप्पण प्रवीण पुजारी यांनी वाचले. ‘आमची गझलसाद’ हा समूहाच्या बारा गझलकारांचा प्रातिनिधिक गझलसंग्रह खलीलजींना सुभाष नागेशकर यांच्या हस्ते भेट दिला.
प्रथम सत्रात गझलसादींचा बहारदार गझल मुशायरा झाला. त्यामध्ये डॉ. कुलकर्णी, नरहर कुलकर्णी, अशोक वाडकर, सुरेश कुलकर्णी, प्रवीण पुजारी, अविनाश शिरगावकर यांनी सहभाग घेतला. सोहनी यांच्या रचना अनघा पेंढारकर यांनी सादर केल्या. दुसऱ्या सत्रात खलील मोमीन यांनी स्वानुभवावर आधारित काव्य व गझलविषयक उदाहरणांसह विवेचन केले. अस्मिता वाडकर, सुरेश श्रीखंडे, उदय निकम, सुधीर कुंभार, अभय वाडकर, प्रफुल्ल शहा उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com