इचल : आयजीएम मध्ये आय सी यू,सिटी स्कॅन लवकरच सुरू

इचल : आयजीएम मध्ये आय सी यू,सिटी स्कॅन लवकरच सुरू
Published on

ich182.jpg
24228
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयामध्ये सज्ज असलेले सिटी स्कॅन मशिन.
-----------
आयजीएममध्ये आयसीयू सिटी स्कॅन
उद्‍घाटनाची औपचारिकता बाकी ः नागरिकांमधून समाधान
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १८ : आयजीएम या शासकीय रुग्णालयात नव्याने तयार केलेला अत्याधुनिक अतिदक्षता विभाग (आयसीयू) सिटी स्कॅन आणि सोयी सुविधांनी परिपूर्ण असा शस्त्रक्रिया विभाग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले संबंधित विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याने नागरिकांना या सेवेचा लाभ लवकरच घेता येणार आहे. एकंदरीत आधुनिक सोयी सुविधांसाठी खिशाला लागणारी कात्री कमी होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आयजीएम रुग्णालयामध्ये अत्यावस्थेत असलेला रुग्ण दाखल करताना सर्वांत मोठा प्रश्न अतिदक्षता विभाग (आयसीयू युनिट) यांचा उपस्थित होत होता. त्यामुळे रुग्णांना कोल्हापूर किंवा सांगली येथील रुग्णालयात पाठवण्यात येत होते; मात्र आता आयजीएममध्ये २४ बेडची आधुनिक सुविधा व यंत्रणा असलेला अतिदक्षता विभाग तयार केला आहे. त्यासोबत सुसज्ज शस्त्रक्रिया विभागाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यासोबत नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी असलेले सिटी स्कॅन मशिनही बसवले आहे. हे विभाग सुरू करण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग, महापालिका अग्निशामक विभाग तसेच महावितरण विभागाची नाहरकत आवश्यक असते. या विभागातील अधिकाऱ्‍यांनी फायर, इलेक्ट्रिक ऑडिट करून प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे या सुविधा सेवेत आणण्यासाठी पूर्ण तयार असून केवळ उद्‍घाटनाची औपचारिक्ता बाकी आहे; मात्र उद्‍घाटकाची वेळ मिळत नसल्याने या अत्याधुनिक सेवांपासून नागरिक वंचित राहत असल्याचे समजते. ही अत्यावश्यक सेवा असून नागरिकांच्या सेवेत तत्काळ आणणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांना खासगी रुग्णालयात होणाऱ्‍या खर्चापासून बचाव होईल.
--------
अत्यल्प पैशामध्ये सिटी स्कॅन
आयजीएम रुग्णालयात सिटी स्कॅनच्या माध्यमातून अचूक निदान होणार आहे. मशिनची उभारणी करण्यात आली आहे. केवळ एईआरबी (ॲटोमिक एनर्जी रेग्युलेटर बोर्ड) यांचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ते मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अत्यल्प पैशात सिटी स्कॅन उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
--------
सिटी स्कॅन दर (आयजीएम)
तपासणीचे नाव * दर
सीटी हेड-विना कंट्रास्ट* ५४४
सीटी हेड - कंट्रास्टसह (+ सीटी एंजिओग्राफी)*९१८
सीटी चेस्ट - विना कंट्रास्ट (फुफ्फुस)*१०२०
सीटी चेस्ट - कंट्रास्टसह (+सीटी एंजिओग्राफी)*१७००
सीटी स्कॅनवरच्या पोटाचा भाग विना कंट्रास्ट*११५६
सीटी स्कॅनवरच्या पोटाचा भाग कंट्रास्टसह*१६३२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com