रामदास महाराज स्मृतीदिन उद्यापासून

रामदास महाराज स्मृतीदिन उद्यापासून

Published on

राजारामदास महाराज
स्मृतिदिन कार्यक्रम उद्यापासून

कोल्हापूर, ता. १८ ः येथील ब्रह्मपुरी पिकनिक सेंटरजवळील महंत राजारामदास गुरू नारायणदास मठ येथे राजारामदास महाराज स्मृतिदिन उत्सवानिमित्त रविवार (ता. २०) पासून विविध कार्यक्रम होणार आहेत.
रविवारी (ता. २०) सकाळी सात वाजता अभिषेक व इस्कॉन हरिओम नगर यांचे संकीर्तन व पंचगंगा नदीवर गजर फेरी होईल. नऊ वाजता श्री रामनामाचा जप, दुपारी मंत्रघोषात पादुकांना अभिषेक, दुपारी चार वाजता शिवाजी हुपरे यांचा भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी सहा वाजता चिन्मय पुष्पांजलीचे स्वामी दत्तराजानंद यांचे प्रवचन व सात वाजता भक्ती संगीताचा जागर होईल. त्यामध्ये संतोष अंगापूरकर, रणजित बुगले, कुशिरेकर बुवा मंच, डॉ. शिवानी ढेरे-कणकवलीकर, गिरीधर कुलकर्णी, रवी सुतार स्वामी समर्थ भजनी मंडळ, चिले भजन देवकर महाराज सेवा अर्पण करतील. सोमवारी (ता. २१) सकाळी नऊ वाजता मूर्तीस पुष्पहार अर्पण व मंगळवारी (ता. २२) दुपारी १२ वाजता महाप्रसाद होईल, असे जयसिंग हुजरे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com