रस्ते काम निवेदन
24268
‘नवीन रस्ते प्रकल्पातील कामे
सदोष कामे करणाऱ्यांना देऊ नका’
कोल्हापूर, ता. १८ ः शहरातील रस्त्यांची सदोष कामे करणाऱ्या कंत्राटदारांना नवीन रस्ते प्रकल्पातील कामे देऊ नयेत, अशी मागणी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे करण्यात आली. संतोष रेडेकर, फैय्याज झारी, फिरोझ शेख यांनी याबाबतचे निवेदन दिले..
निवेदनात म्हटले आहे, नव्याने केलेले बहुतांश रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने सदोष रस्ते झाले आहेत. खराब रस्त्यांमधून खडी बाहेर पडल्याने, खड्डे पडल्याने अपघातास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर धुळीचे लोट उठत आहेत. नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. नवीन रस्ते कामात गुणवत्ता सिद्ध असलेल्या कंत्राटदारांचाच विचार व्हावा. तसेच रस्ते कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये याकडे लक्ष द्यावे. तसेच खराब रस्त्यांची यादी तयार करून ते दुरुस्त करून घ्यावेत. त्यात कसूर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. रस्त्यांवर, चौकात उभ्या राहणाऱ्या राजकीय, अराजकीय स्वागत कमानींना बंदी करावी. उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. शाहू टोलनाका ते एस. पी. ऑफिस, आर.टी.ओ. समोरील रस्ता, साई एक्स्टेंशन, बागल चौक येथील रस्ता सदोष असल्याने दायित्व कालावधीच्या नियमानुसार दुरुस्त करावा.
यावर अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी पारदर्शकता आणि गुणवत्तेबाबत खबरदारी घेऊ. स्थानिक नागरिकांचा अभिप्राय, तक्रारींची वेळीच दखल घेऊ असे आश्वासन दिले. शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

