इंगवले पत्रकार परिषद
गांधी मैदानाच्या निधीतून
क्षीरसागर कुटुंबाचा विकास
रविकिरण इंगवले यांचा आरोप
कोल्हापूर, ता. १८ ः ‘‘गांधी मैदानातील टर्फसाठी आलेल्या ७६ लाखांचे काम अर्धवट टाकले आहे. मैदानाचा विकास झालेला नाही; पण त्या निधीतून राजेश क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबाचा स्वतःचा विकास सुरू आहे,’ असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला.
इंगवले म्हणाले, ‘गांधी मैदानसाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी २०२१ मध्ये महापालिका आयुक्त कादंबरी डॉ. बलकवडे यांना डीपीआर तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर आमदार जयश्री जाधव यांनी नगरविकास खात्यास तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या माध्यमातून गांधी मैदानसाठी निधी दिल्याचे कागदोपत्री दिसते. मात्र, राजेश क्षीरसागर श्रेयवादासाठी खोटे बोलत आहेत. गांधी मैदानसाठी माझ्या प्रयत्नातून राज्य शासनाकडून निधी आणला. क्षीरसागर यांच्या मुलाने विविध ठिकाणच्या टर्फ मैदानाच्या कामाची निविदा भरली. तेथील टर्फचे काम ऋतुराज क्षीरसागरनी घेतले व वाताहत केली. ७६ लाखांचा निधी मिळाल्यानंतर काम अर्धवट टाकून चार वर्षे झाली. खेळाडूंना मैदानाचा लाभ नाही. ते महपालिकेकडे हस्तांतरीत केलेले नाही. काम पूर्ण न करता अंदाजे ४० लाख रूपये रक्कम घेतली. इतर चार ठिकाणीही त्यांनी लाखो रूपयांची टर्फची कामे करूनही दुरवस्था आहे. मी दिलेले पुरावे खोटे आहेत हे त्यांनी स्वतः व मुलांनी सांगावे. यासाठी क्षीरसागर कुटुंबीयांना ब्लॅक लिस्ट करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करणार आहे.’’
जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी आदी उपस्थित होते. याबाबत राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नंतर प्रतिक्रिया देऊ असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

