रक्तदान शिबिर
यिन लोगो आवश्यक -
...
‘यिन’च्या वर्धापन दिनानिमित्त
आज रक्तदान शिबिर
कोल्हापूर, ता. १८ : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’, असा नारा देत तरुणाई रक्तदानासाठी सज्ज झाली आहे. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) नवव्या वर्धापन दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाजी उद्यमनगरातील ‘सकाळ’ कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर उद्या (ता. १९) हा उपक्रम होणार आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) सहकार्याने उपक्रम होत आहे.
वैविध्यपूर्ण उपक्रमांतून तरुणाईतील नेतृत्व घडविण्यासाठी यिन कार्यरत आहेत. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यिनशी जोडली गेली असून, सामाजिक बांधिलकीतून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शॅडो मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील लोकांशी संवादप्रसंगी लोकांचे गाऱ्हाणे थेट मंत्र्यांपर्यंत ते मांडत आहेत. अवघ्या नऊ वर्षांच्या काळात यिन समाज घटकांशी एकरूप झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे असो, गरिबांना चादर वाटप असो की, निराधारांसमवेत रक्षाबंधन साजरा करणे असो, अशा उपक्रमांतून यिनने वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तरुणाई पुन्हा सरसावली आहे. उद्या सकाळी दहा वाजता या उपक्रमास सुरुवात होणार आहे. तसेच YIN@9 या विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. यिनचे आजी-माजी विद्यार्थी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करणार आहेत. अधिक माहितीसाठी यिन सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड (९९७५१३१२७०) यांच्याशी संपर्क साधावा.
---
* दिवसभरातील कार्यक्रम असे ...
- रक्तदान - सकाळी १० ते दुपारी २
- विशेषांक प्रकाशन - २ ते ३
- यिन आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा - दुपारी ३ ते ४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

