विज्ञानवारी प्रकल्प कार्यशाळा आज, उद्या

विज्ञानवारी प्रकल्प कार्यशाळा आज, उद्या

Published on

विज्ञानवारी प्रकल्प
कार्यशाळा आज, उद्या
गडहिंग्लज : येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे आज व उद्या (ता. १९ व २०) सकाळी १० ते ५ या वेळेत विज्ञानवारी प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. मुंबई मराठी विज्ञान परिषद व पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीतर्फे ही कार्यशाळा होणार आहे.
भाजी मंडईच्या दुसऱ्‍या मजल्यावरील सायन्स सेंटरमध्ये ही कार्यशाळा होईल. कार्यशाळेत पुणे, पेडणे, लोणावळा, कोल्हापूर, इस्लामपूर, बिद्री, आजरा, चंदगड, निपाणी व गडहिंग्लज विज्ञान परिषदेच्या संलग्नीत १०० महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मुंबईचे अभय यावलकर, विजय लाळे, प्रकाश मोडक, केतन शेलार हे आवाजाची दुनिया, विद्युत चुंबक, गुरुत्वमध्य, पृष्टीय ताण, घनता, प्रकाश, विविध रासायनिक प्रक्रिया आदी विषयावर प्रयोग करुन दाखवण्यासह मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या अध्यक्षपदी जे. बी. बारदेस्कर असून डॉ. दिलीप साठे, प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे प्रमुख पाहुणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com