शाहू बँक निवड

शाहू बँक निवड
Published on

24299
...
शाहू गव्हर्न्मेंट बँकेच्या
अध्यक्षपदी अतुल जाधव

उपाध्यक्षपदी अजित पाटील यांची निवड

कोल्हापूर, ता. १८ : राजर्षि शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस्‌ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अतुल जाधव, तर उपाध्यक्षपदी अजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी संचालक मंडळाची सभा सहायक निबंधक श्रीमती प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी शिवदास यांना सर्व संचालकांचा परिचय करून दिला. अध्यक्षपदासाठी जाधव यांचे नाव संचालक रवींद्र पंदारे यांनी सुचविले. त्यास संचालक मधुकर पाटील यांनी अनुमोदन दिले. विलासराव कुरणे यांनी उपाध्यक्षपदासाठी श्री. पाटील यांचे नाव सुचविले. त्यास रमेश घाटगे यांनी अनुमोदन दिले. सभाध्यक्ष शिवदास यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाकरिता एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षपदी श्री. जाधव, उपाध्यक्षपदी श्री. पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी संचालक शशिकांत तिवले, मधुकर पाटील, रोहित बांदिवडेकर, रमेश घाटगे, हेमा पाटील, श्रीमती मनुजा रेणके, संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com