

जिल्हा परिषद ... लोगो
...
माझी वसुंधरा अभियान
लोकसहभागातून यशस्वी करा
मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर,ता.१८: ‘माझी वसुंधार अभियान ४.० अंतर्गत होणारी कामे कायमपणे टिकणारी असतील याची दक्षता घ्यावी. तसेच ही कामे यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाची मदत घ्यावी’, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले.
माझी वसुधंरा अभियान ४.० अंतर्गत जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींपैकी केंद्रित केलेल्या ग्रामपंचायतीकडील संबंधित सहाय्यक गट विकास अधिकारी तथा तालुका नोडल अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व तालुका व्यवस्थापक यांची कार्यशाळा वसंतराव नाईक समिती सभागृह घेण्यात आली. या कार्यशाळेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘एखादे काम करत असताना नकारात्मक प्रसिध्दीला सामारे जावे लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. असे झाले तर त्याचा सर्व कामावर परिणाम होतो. त्यामुळे या अभियानामध्ये मनापासून सहभागी झाल्यास हे अभियान अत्यंत चांगल्या पध्दतीने यशस्वी करणे शक्य होणार आहे. तसेच उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्व ओळखून, त्याचे विकृतीकरण रोखून संवर्धन करण्यावर सर्वांनी भर द्यावा.’
दरम्यान, माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये राज्यस्तरावर व्दितीय क्रमांक मिळविणाऱ्या धरणगुत्ती (ता.शिरोळ) व पुणे विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळविवणाऱ्या वाटंगी (ता.आजरा) ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय तांत्रिक तज्ज्ञ गौरी पाटील यांनी पंचमहाभूतांच्या अनुषंगाने शासनास अभिप्रेत सादरीकरण केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. ए.एस.कठारे, नितीन मोहिते, एस.एस.चौगले कार्यक्रमाचे नियोजन केले. आभार सचिन शिरदवाडे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.