

फोटो
सकाळ इम्पॅक्ट... लोगो
...
गोकुळ शिरगाव औद्योगिक
वसाहतीत उभारणार ‘फायर स्टेशन’
सामंतः कौशल्य विकास केंद्रासाठी सामंजस्य करार करणार
कोल्हापूर, ता. १८ ः गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये फायर स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या १३ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. लवकरच हे स्टेशन उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीला फायर स्टेशनची गरज असल्याचे ‘सकाळ’ने १७ जानेवारी रोजी ‘जागा आहे; फायर स्टेशन नाही’ या वृत्तातून मांडले होते. त्यावर आमदार ऋतुराज पाटील आणि ‘गोशिमा’च्या पदाधिकाऱ्यांनी या फायर स्टेशनसाठी उद्योगमंत्री सामंत यांना प्रत्यक्ष भेटून, पत्र देवून पाठपुरावा केला. मंत्री सामंत यांनी या औद्योगिक वसाहतीची गरज लक्षात घेवून फायर स्टेशनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या स्टेशनचा गोकुळ शिरगावसह कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला देखील उपयोग होणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर फौंड्री क्लस्टर अंतर्गत गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कौशल्य विकास केंद्र (स्कील डेव्हलपमेंट सेंटर) निर्मिती केली आहे. त्याठिकाणी राबविण्यात येणाऱ्या रेडी इंजिनिअर आणि कौशल्य विकासाच्या उपक्रमांची माहिती उद्योजक सचिन शिरगावकर यांनी मंत्री सामंत यांना दिली. या केंद्राच्या अद्ययावतीकरणासाठी निधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर कौशल्य विकासाला बळ देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ या केंद्रामध्ये सामंजस्य कराराच्या माध्यमातून सहभागी होईल. तीन कोटींचा निधी दिला जाईल. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करा, असे सामंत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.