भगवान महावीर अध्यासनाला दुर्मिळ ग्रंथ, एक लाखाची देणगी

भगवान महावीर अध्यासनाला दुर्मिळ ग्रंथ, एक लाखाची देणगी

Published on

24318
...

भगवान महावीर अध्यासनाला
दुर्मिळ ग्रंथ,एक लाखाची देणगी

कोल्हापूर ः येथील रत्नाप्पा कुंभार नगरमधील सरोज चौगुले यांनी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनास आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ दुर्मिळ ग्रंथ आणि एक लाख रूपयांची देणगी दिली. चौगुले यांनी प्राचीन १६ ग्रंथ आणि नित्य वाचनासाठी त्यांचे धाकटे बंधू प्राचार्य डॉ. सुभाषचंद्र मादनाईक आणि ज्येष्ठ बंधूसमान तात्यासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ १२० पुस्तके दिली. अध्यासनाच्या प्रस्तावित इमारतीसाठी त्यांनी एक लाख रूपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. चौगुले यांचा सत्कार कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल आणि विद्यापीठ बोधचिन्ह, ग्रंथ देवून करण्यात आला. अध्यासनाच्या पदविका व प्रमाणपत्र परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव विलास शिंदे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, प्रा. आर. बी. पाटील, बी. डी. खणे, आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. विजय ककडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com