श्रावण सोमवार

श्रावण सोमवार

फोटो- २९९४५

शंभो शंकरा करुणाकरा...!
पहिल्या श्रावण सोमवारी शिवमंदिरे गर्दीने फुलली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः ‘शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान...’, ‘शंभो शंकरा करुणाकरा..’ असा शिवमहिमा गात आज शहर आणि जिल्ह्यात पहिला श्रावण सोमवार पारंपरिक उत्साहात साजरा झाला. पहाटे मंदिरात विविध धार्मिक विधी झाले आणि त्यानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यंदाच्या श्रावणात चार सोमवार असून, यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज माहेश्वरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक शेखर मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली. मातृलिंग मंदिर आज भाविकांसाठी दिवसभर दर्शनासाठी खुले राहिले. चारही सोमवार मातृलिंग मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असेल. कोल्हापूरचे ग्रामदैवत असलेल्या कपिलतीर्थ मार्केट येथील कपिलेश्वर मंदिर, उत्तरेश्वर, रावणेश्वर, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर, कैलासगडची स्वारी, ऋणमुक्तेश्वर, पंचगंगा घाटावरील सर्वेश्वर आदी मंदिरात दिवसभर गर्दी राहिली. दरम्यान, परंपरेप्रमाणे पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणून तांदूळ वाहण्यात आले.

चौकट
बेलाची झाडे लावण्याचे आवाहन
‘बेलाची झाडे लावून श्रावण सोमवार साजरा करा’ असे आवाहन विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी विविध माध्यमातून केले आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी बेलाच्या रोपांचे वाटपही झाले. त्याशिवाय मंदिर परिसरात भाविकांना विविध उपवासाच्या पदार्थांचेही वाटप झाले.

चौकट
सहकुटुंब भोजनाची परंपरा
श्रावण सोमवारी उपवासाची परंपरा बदलत्या काळातही कायम आहे. यानिमित्ताने रात्री केळीच्या पानावर सहकुटुंब भोजन करून उपवास सोडण्यात आला. त्यासाठी केळीच्या पानांसह विविध गोड पदार्थांना मोठी मागणी राहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com