काम शाहूवाडी,पन्‍हाळ्यात ठिय्‍या मुख्यालयात

काम शाहूवाडी,पन्‍हाळ्यात ठिय्‍या मुख्यालयात

24930
...
जिल्‍हा परिषद ... लोगो
...

काम शाहूवाडी-पन्‍हाळ्यात, ठिय्‍या मुख्यालयात

पाणी पुरवठा विभागाचा अजब कारभार; अधिकाऱ्यां‍ची सोय अन् जनतेची गैरसोय

सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर,ता.२१: जिल्‍हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या पन्‍हाळा, शाहूवाडी उपविभागाचे काम जिल्‍हा परिषदेच्या मुख्यालयातून अनेक वर्षे सुरु आहे. काही काळ हे कार्यालय शाहूवाडी येथे नेण्याचा प्रयत्‍न झाला. मात्र पुन्‍हा २००६ सालापासून आजअखेर हे कार्यालय मुख्यालयात स्‍थिरावले आहे. दुर्गम तालुक्यातील जनतेची गैरसाय होत असताना त्यावरती लोकप्रतिनिधी ''ब्र'' देखील काढत नाहीत, हे त्याहूनही गंभीर आहे.

जिल्‍हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्‍था केली जाते. आता तर जल जीवन मिशनमुळे सर्वच्या सर्व गावात पाण्याच्या योजनांचे काम सुरु आहे. वास्‍तविक प्रत्येक कर्मचाऱ्या‍ने मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. मात्र या उपविभागाला कदाचित हा ‘आदेश’ लागू नसल्याने आजअखेर दोन्‍ही तालुक्यांचा कारभार मुख्यालयातूनच सुरु आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी पन्‍हाळा व शाहूवाडी हे स्‍वतंत्र उपविभाग करण्याचाही निर्णय घेतला आहे.
नवीन उपविभाग झाल्यानंतर तत्‍कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी, या दोन्‍ही उपविभांगाना ज्या-त्या तालुक्यात जाण्याचे आदेश दिले. मात्र आजअखेर या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. दोन्‍ही तालुक्यांचा कारभार मुख्यालयातूनच सुरु आहे. मुळात हे दोन्‍ही तालुके दुर्गम आहेत. तेथील ग्रामस्‍थांना कोल्‍हापूर येथे येणे हे आर्थिकदृष्‍ट्या परवडणारे नसून वेळेचाही अपव्यव करणारे आहे. मुळात हे विभाग जनतेच्या सोयीसाठी आहेत, याचाच विसर प्रशासनाला पडला असल्याचे चित्र आहे.
...

इतर विभागांकडून कार्यालयाचा ताबा
प्रत्येक पंचायत समितीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय आहे. मात्र वर्षानुवर्षे पन्‍हाळा, शाहूवाडीचे अधिकारी तालुक्याला जात नसल्याने इतर विभागांनी कार्यालयाचा ताबा घेतला. शाहूवाडी पंचायत समितीत पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय आहे. नव्या आकृतीबंधानुसार कार्यालयाचा विस्‍तार आवश्यक आहे. मात्र उपअभियंता केबिन उपलब्‍ध असून सध्या सहाय्‍यक गट विकास अधिकारी या केबिनचा वापर करत आहेत.
....
कोट
‘दोन्‍ही पंचायत समितीत कार्यालयाला जागा व फर्निचर उपलब्‍ध झालेले नाही. त्यामुळे कार्यालयाचे स्‍थलांतर करण्यात आलेले नाही.
आर.पी.भोंगाळे, उपअभियंता, शाहूवाडी,पन्‍हाळा
...

‘संबंधित उपविभागाच्या अधिकाऱ्यां‍ना पन्‍हाळा, शाहूवाडी येथे काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. यावर त्यांनी दोन्‍ही पंचायत समितीत जागा उपलब्‍ध नसल्याचे तोंडी सांगितले आहे. त्याठिकाणी जागा उपलब्‍ध करण्याबाबत लेखी पत्रव्यवहार केल्याचे निदर्शनास आलेले नाही. याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.
श्रीप्रसाद बारटक्‍के, प्र.कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा
...

‘जिल्‍ह्यातील जल जीवनची चर्चा आणि कामांच्या तक्रारी राज्यात पोहोचल्या आहेत. त्यामुळे गावस्‍तरावर योजनांचे कामकाज कशा पध्‍दतीने सुरु आहे, याची सर्वांनाच कल्‍पना आहे. पाणी योजनांचे काम दर्जेदार होण्यासाठी अभियंत्यांनी तालुका मुख्यालयात, भागात असणे आवश्यक आहे. कोल्‍हापुरात बसून योजनांचे नियंत्रण अशक्य आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा.

विजय बोरगे, माजी जि.प. सदस्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com