कळंबा कारागृहात आणखी तीन मोबाईल हॅण्डसेट

कळंबा कारागृहात आणखी तीन मोबाईल हॅण्डसेट

24975
कोल्हापूर - कळंबा कारागृहात सापडला पेनाच्या टोपणाइतका मोबाईल.

कळंबा कारागृहात आढळला
पेन टोपणाच्या उंचीचा हॅण्डसेट
रविवारच्या कारवाईत एकूण सात मोबाईलसह एक सीमकर्ड जप्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः कळंबा मध्यवर्ती कारागृहात आणखी तीन मोबाईल हॅण्डसेट आणि एक सीमकार्ड सापडले आहे. विशेष म्हणजे पेनाच्या टोपणा इतक्या लहान आकाराचे हॅण्डसेट आहेत. कारागृहाच्या विशेष झडतीत रविवारी दुपारपर्यंतच्या सत्रात चार मोबाईल हॅण्डसेट सापडले होते. त्यानंतर सायंकाळी झालेल्या तपासणीत हे हॅण्डसेट झेंडूच्या रोपाच्या मातीत मिळाले. यासंदर्भातील गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नोंद आहे.
कारागृहात मोबाईल हॅण्डसेट सापडण्‍याची मालिकाच सुरू आहे. रविवारच्या झडतीत सापलेल्या हॅण्डसेटची संख्या आता सात झाली आहे. आणखी किती आणि कोणकोणत्या ठिकाणी असे हॅण्डसेट लपविले आहेत, याचाही तपास सुरू आहे. रविवारी सायंकाळी मिळालेल्या हॅण्डसेटबाबतची फिर्याद तुरुंगाधिकारी (वर्ग दोन) भारत उत्तरेश्‍वर पाटील (रा. कळंबा मध्यवर्ती कारागृह वसाहत) यांनी दिली आहे.
कारागृहात मागील महिन्यात एका कर्माचाऱ्यानेच गांजा विक्री केल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर पुण्यातील पथकाने कारागृहाची तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार रविवारी दिवसभर तपासणी झाली. त्यात सर्कल क्रमांक पाच या मंडल कार्यालयातील शेतीच्या परिसराची झडती घेतली. तेथे एका झेंडू रोपाच्या मातीच्या ढिगाखाली हॅण्डसेट मिळाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी तपास करीत आहेत.

जप्त केलेले हॅण्डसेट
०) ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी, पांढरे सीमकार्ड क्रमांकसह, बटनांचा, काळा, किंमत अंदाजे हजार रुपये
०) ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी, दुहेरी सीम स्लॉट; पण कार्ड नसलेला निळा बटनाचा हॅण्डसेट, अंदाजे किंमत सुमारे हजार रुपये
०) सीम कार्ड नसलेला व केचड्डा बीएल ४ सी असे लिहिलेली लाल बॅटरी असलेला काळा हॅण्डसेट, किंमत अंदाजे हजार रुपये

ड्युयल सीम कार्ड आणि मेमरी कार्डही
केवळ पेनाच्या टोपणाच्या उंची इतका केचड्डा कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट आहे. त्यामध्ये ड्युयल सीम कार्ड आणि मेमरी कार्डही बसू शकते. केवळ हजार रुपयांत हॅण्डसेटची विक्री होते. कारागृहातील संशयित कैदी वैद्यकीय किंवा न्यायालयीन कामासाठी बाहेर गेल्यानंतर तेथील शौचालयाचा आसरा घेऊन हा हॅण्डसेट कारागृहात नेला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केले आहे.

गुन्हेगारीसाठी वापर
कारागृहातील काही गुंडांकडून, न्यायालयीन बंदींकडून, शिक्षा झालेल्या कैद्यांकडून मोबाईल हॅण्डसेटचा वापर केला जात आहे. कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्‍ह्यातील गुन्हेगारी करण्यासाठी कारागृहातून काही कैद्यांनी मोबाईल हॅण्डसेटचा वापर केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळेच कळंबा कारागृहात गांजा आणि हॅण्डसेट वारंवार मिळत असल्याच्या नोंदी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com