कन्हैय्या कुमारचे योगदान काय ?

कन्हैय्या कुमारचे योगदान काय ?

कन्हैय्याकुमारचे देशाच्या विकासात
योगदान काय?ः खासदार महाडिक
कोल्हापूर ः ‘राज्यात काँग्रेसची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, त्यांना कन्हैय्याकुमार सारख्यांना आणून कार्यक्रम घ्यावे लागतात. देशाच्या विकासात कन्हैय्याकुमार याचे योगदान काय? तो कोणत्या सभागृहाचा सदस्य आहे?’ अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली. काँग्रेसचे नेते कन्हैय्याकुमार यांनी रविवारी कोल्हापुरात केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार महाडिक म्हणाले, ‘देशात आणि राज्यात काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. कारण त्यांना टुकडे टुकडे गँगचा एक तुकडा असणारा कन्हैय्याकुमार कार्यक्रमासाठी आणावा लागतो. तो कोणत्या सभागृहाचा सदस्य आहे? देशाच्या विकासात त्याचे योगदान काय? राज्यात काँग्रेसकडे कोणी दुसरा नेता नाही का?’ लोकसभा तयारीविषयी ते म्हणाले, ‘आमच्या कुटुंबातील व्यक्ती लोकसभा लढवण्यास तयार आहेत. पण पक्ष जो आदेश देईल त्या प्रमाणे काम करू.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com