तांदूळाचे उत्पादन, निर्मित अन् उत्तर भारतातील भात पिक
26085/ 26087
बिग स्टोरी... लोगो
...
तांदळाचे क्षेत्र घटले
अन्य राज्यांतील तांदळावर जिल्ह्याची मदार, क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज
लिड
२०११ च्या जणगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाख आहे. या लोकसंख्येसाठी लागणारा तांदूळ हा एकटा कोल्हापूर जिल्हा पुरवू शकत नाही, हे वास्तव आहे. याकरिता दररोजच्या वापरासाठी लागणारा तांदूळ आपल्याला देशातील अन्य राज्यांतून आणावा लागतो. जिल्हा-शहरासाठी लागणारा तांदूळ दररोज अंदाजे तीन ते चार हजार टन अन्य भागातून येतो. पूर्वी हा तांदूळ जिल्ह्यातील पश्चिम भागातून येत असे; मात्र ऊस क्षेत्रात वाढ होत गेली आणि भाताची खाचरे कमी होत गेली. त्यामुळे तांदळाच्या मागणीसाठी उत्तर भारतातील राज्ये, चंद्रपूर, नाशिक, आंध्रप्रदेश, कर्नाटकवर अवलंबून राहावे लागत आहे. म्हणून तांदळाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाबरोबर शेतकऱ्यांनाही विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
...
-अमोल सावंत
...
कोल्हापूरची मागणी
तांदळाचा दररोजचा वापर शहर-जिल्ह्याकरीता अधिक आहे. उत्तर भारतातून बासमती तांदळांचे ब्रॅन्डस् तर नागपूरमधून मसुरी, सोना मसुरी, वाडा कोलम, लष्करी कोलम तसेच नाशिक विभागातून इंद्रायणी, रत्नागिरी, इतर सुवासिक तांदूळाची आवक होते. त्यातही चंद्रपूर, नाशिकवरुन जास्त तांदूळ कोल्हापूरकडे येतो. याशिवाय मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, रायचूर, शिमोगा (कर्नाटक) इथूनही तांदूळ मागवला जातो.
...
जिल्ह्यातील तांदळाची स्थिती
कोल्हापूरचा पश्चिम भाग म्हणजे, भात पिकाचे आगर; पण हे आगर ऊस पिकाने व्यापल्याने भात पिकामध्ये गतीने घट होत गेली. भात पिकासाठी लागणारी नैसर्गिक अनुकुलता जसे की, पश्चिम भागातील धुवॉंधार पाऊस, आर्द्रता, तापमानामुळे भात पिकांचे उत्पादन पूर्वी प्रचंड होते. हा भात जिल्ह्याची गरज भागवत असे. आता ही स्थिती नाही. राधानगरी, गडहिंग्लज, गारगोटी, चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहुवाडी, पन्हाळा भागातून भात पिकाची आवक होती. स्थानिक इंद्रायणी, सारथी, कर्जत तर रत्नागिरी तांदळातील अवनी, शुभांगी, दफ्तरी, सोनमबरोबर आजऱ्याचा घनसाळ मिळतो; पण प्रमाण तुलनेने कमी आले. त्यातही घनसाळ, काळा जिरग्याला मागणी असूनही पिक कमी असल्याने हा तांदूळ जिल्ह्याच्या लोकसंख्येला पुरत नाही.
...
कोल्हापूरची पसंती
शहर- जिल्ह्यात नॉन व्हेज खाण्याचे प्रमाण अधिक असल्याने बिर्याणीसाठी लागणाऱ्या तांदळांच्या ब्रॅन्डना मागणी असते. बासमती, इंद्रायणी तांदळाचा दररोजच्या आहारातील वापरही अधिक असून बिर्याणीसाठी बासमीतील दिल्ली राईस, शहजादा, दावत पुलाव, रॉयल रेडरोझ, सुपर दावत, चमक, केशव, दिलनूर, मेट्रो, जलसा असे ब्रॅन्ड उपलब्ध आहेत. बासमती तांदळात बारीक, मोठा, तुकडा, बिर्याणीसाठी अखंड असे प्रकार आहेत. बिर्याणीकरीता तर बासमती ब्रॅन्डला कोल्हापुरकरांची मागणी असते. दररोजच्या वापराकरीता रेग्युलर तर कार्यक्रमासाठी स्टीम राईसचा वापर होतो. पॉलिश, बिगर पॉलिश असेही तांदळाचे प्रकार आहेत.
...
तांदूळ का महागला?
-सुधारित,अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींच्या लागवडीखाली असलेले कमी क्षेत्र
-भातशेती करणारे ८०-८५ टक्के अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी
-सेंद्रिय,रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा कमी,असंतुलीत वापर
-जादा पाऊस, कमी पाऊस खार जमिनी, लोहाची कमतरता
-कीड रोग-तण नियंत्रण उपायांचा अल्प प्रमाणात वापर
-रोप लावणी करताना लागणारा अधिक कालावधी
-हवामान बदल, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
-सिंचनक्षेत्रातील असमानता
-शेतमजुरांची उपलब्धता कमी
-खते पुरवठ्यात अडचणी
...
चौकट
बासमती तर ‘फेमस’ ब्रॅन्ड
बासमतीने भारताची बाजारपेठ व्यापली आहेच; पण हा बासमती नेपाळ, बेनिन, सेनेगल, बांगलादेश, गिनी इथेही निर्यात होतो. जागतिक बाजारपेठेत बासमतीचा प्रमुख निर्यातदार भारत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश ही बासमती तांदळाचे सर्वाधिक उत्पादन क्षेत्रे आहेत. अपेडा संस्थेच्या मते, बासमती तांदूळ सोडून इतर कोणत्याही तांदळाला ‘नॉन-बासमती’ तांदूळ असे नाव दिले जाते.
...
भाताचे प्रकार किती?
जगात भाताचे तीस हजारांपेक्षा जास्त प्रकार असून भारतात लागवडीतील प्रकार सहा हजार आहेत. जंगली प्रजातीही पुष्कळ आहेत. लागवडीतील बहुसंख्य प्रकार ओरिझा सटायव्हा जातीच्या इंडिका उपजातीत मोडतात. या उपजातीत लांब दाण्याचे प्रकार असतात; पण मध्यम लांब, आखूड दाण्याचे प्रकारही आहेत. लागवडीखाली अतिहळवे, हळवे, गरवे, अतिगरवे असे प्रकार असून अनिश्चित पाण्याच्या उपलब्धतेमुळे लवकर तयार होणाऱ्या हळव्या भाताच्या प्रकारांना महत्त्व आहे. कोकण विभागात कोळंबा, झिनिया, हळवी, कोळपी, कडा, भडस तर मावळ आणि दक्षिण सिंचन विभागात आंबेमोहर, बासमती, कृष्णसाळ, चिमणसाळ, कमोद, दोडगा तसेच पुणे-सातारा जिल्ह्यांच्या मावळ भागात अथवा दक्षिण सिंचन विभागात हीच लागवड करतात. नाशिक-नगर जिल्ह्यांत कमोद तांदळाचा प्रकार तर विदर्भ विभागात लुचई, चिनोर, बानसपत्री, भोंदू परेवा हा प्रकार मिळतो.
...
‘जिल्ह्यात ३५ राईस मिल्स आहेत. स्थानिक शेतकरी, ब्रोकरच्या माध्यमातून हा भात मिल्समध्ये येतो. तिथे या भातावर प्रक्रियेद्वारे तांदूळ तयार होतो. मग हा तांदूळ विविध माध्यमातून बाजारपेठेत येतो. तरीही अन्य राज्यातून तांदूळ मागवावा लागतो.
-चंद्रकांत कागले, व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.