विद्यार्थी, शिक्षकांची आता ‘स्मार्ट’ उपस्थिती

विद्यार्थी, शिक्षकांची आता ‘स्मार्ट’ उपस्थिती

Published on

27006
27007


विद्यार्थी, शिक्षकांची ‘उपस्थिती’ होणार ‘स्मार्ट’
शिक्षण विभागाचे मोबाईल अॅप; क्लिकवर समजणार वर्गातील पट

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांची रोजची उपस्थिती आता ‘स्मार्ट’ होणार आहे. वर्गातील उपस्थिती एका क्लिकवर समजावी यासाठी शिक्षणाकडून स्विफ्ट चॅट ॲपचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार हे ॲप बहुतांश शिक्षकांनी स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड करून घेतले आहे.
या अॅपद्वारे शिक्षक, विद्यार्थी यांची रोजची वर्गातील हजेरी ‘स्मार्ट उपस्थिती’ या बोटवर भरावी लागणार आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना वर्ग व विषयवार ‘स्वाध्याय’ दिले जाणार आहेत. स्वाध्याय सोडविल्यानंतर दिलेल्या एकूण प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर सोडविली ते लगेचच समजणार आहे. शाळांनी यापूर्वी शालार्थ, युडायस, शाळा सिद्धी या विविध ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी, शिक्षकांची भरलेली संपूर्ण माहिती या अॅपला संलग्न केली आहे. शिक्षकांना स्वतःचे नाव, शालार्थ आयडी आणि शाळेचा युडायस कोड वापरून अॅपमध्ये लॉगीन करावे लागते. एकदा लॉगीन झाल्यावर हे अॅप शिक्षकांना वापरता येणार आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण मुख्याध्यापकांना दिले आहे. जुलैपासून या अॅपची राज्यभर अंमलबजावणी होणार होती; मात्र काही तांत्रिक कारणास्तव ती झाली नाही. लवकरच या ॲपची अंमलबजावणी होईल.

चौकट
अंमलबजावणीपूर्वी याचा विचार आवश्‍यक
शहरी भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध होते; पण ग्रामीण अथवा डोंगराळ भागात ‘स्मार्ट उपस्थिती’ भरताना अडचणी येणार आहेत. ‘स्वाध्याय’ सोडविताना विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनची उपलब्धता किती प्रमाणात होऊ शकते, याचा शासनाने विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
................
कोट
शिक्षकांना शाळेत रोज विविध प्रकारांची माहिती ऑनलाईन भरावी लागते. त्यात ‘स्मार्ट उपस्थिती’ची भर पडणार आहे. शाळा अथवा शिक्षकांना ऑनलाईन कामासाठी लागणाऱ्या इंटरनेट डाटाचा खर्च स्वतःच करावा लागतो. ग्रामीण आणि डोंगराळ भागातील शाळांना संबंधित माहिती भरण्यासाठी नेटवर्क असलेल्या ठिकाणी जावे लागते. शासनाकडून मागविल्या जाणाऱ्या सततच्या ऑनलाईन माहितीमुळे शिक्षक हैराण झाले आहेत. त्याचा विचार व्हावा.
-राजेंद्र कोरे, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ.
....................
चार्ट करावा
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण
प्राथमिक शाळा- २६३८
शिक्षकांची संख्या-१२०१०
मुलांची संख्या -१,५८,७००
मुलींची संख्या-१,४४,१६२
.....................
चार्ट करावा
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण
शाळा- ७७०
शिक्षकांची संख्या-६४३७
मुलांची संख्या -९३२५५
मुलींची संख्या-७५४३६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com